लग्न कार्यासाठी जाणाºया जीपची ट्रॅक्टरला धडक; एक जण ठार, तिघे जखमी

By appasaheb.patil | Published: December 19, 2019 12:58 PM2019-12-19T12:58:02+5:302019-12-19T13:03:02+5:30

उमरगा परिसरात झाला अपघात; मंद्रुप येथील खाडे कुटुंबिय निघाले होते लग्नाला

A Jeep tractor heading for a wedding party; One killed, three injured | लग्न कार्यासाठी जाणाºया जीपची ट्रॅक्टरला धडक; एक जण ठार, तिघे जखमी

लग्न कार्यासाठी जाणाºया जीपची ट्रॅक्टरला धडक; एक जण ठार, तिघे जखमी

Next
ठळक मुद्दे- उमरगा शहराजवळील जत्तीपूर गावाजवळील घटना- या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी- अपघातातील मयत व जखमी सोलापूर जिल्ह्यातील मंदु्रप गावचे रहिवासी

सोलापूर : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ऊसाच्या ट्रॅक्टरला जीपने जोराची धडक दिली. या धडकेत सोलापुरातील एक जण जागीच ठार झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गुलबर्गा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत़ हा अपघात सकाळी नऊच्या सुमारास उमरग्याजवळील जक्केकूर  गावाजवळ झाला.

मंद्रुप (ता़ द़ सोलापूर) येथील खाडे कुटुंबिय लग्न कार्यासाठी गुलबर्ग्याला जात होते़ सकाळी नऊच्या सुमारास उमरगा शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जत्तीपूर गावाजवळ ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर जात होता. यावेळी जीप चालकाचे संतुलन बिघडल्याने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. या धडकेत एक जण जागीच ठार झाले असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे़ या घटनेनंतर कर्नाटक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. 

 

Web Title: A Jeep tractor heading for a wedding party; One killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.