धर्मजागृती महासंमेलन;श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:51 PM2022-11-12T23:51:03+5:302022-11-12T23:51:33+5:30

सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे.

Dharma Jagruti Mahasamelan in January; Deputy Chief Minister Fadnavis will attend the Shreeshail Peetha program | धर्मजागृती महासंमेलन;श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

धर्मजागृती महासंमेलन;श्रीशैल पीठाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर :  सूक्षेत्र श्रीशैल येथे श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे द्वादश पीठारोहण व जन्म सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार असल्याची माहिती  महाराष्ट्र विभागाचे स्वागत अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. शनिवारी मुंबई येथे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, मैंदर्गीचे निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी व समाजसेवक कांतप्पा धनशेट्टी आदी शिष्टमंडळातील सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दि. १० ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलनच्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.     

सध्या श्रीशैल पिठाचे जगद्गुरूंचे येडूर ते श्रीशैल असे ५६० किलोमीटरचे पदयात्रा चालू असून ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा श्रीशैल येथे पोहचणार आहे. दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. श्रीशैल येथे दि.१ डिसेंबर ते १०  जानेवारी पर्यंत जगद्गुरुंचे ४१ दिवसांची धार्मिक अनुष्ठान, रुद्रहोम,इष्टलिंग महापूजा, जगद्गुरुंच्या लिंगोद्भव  मूर्तीचे बिल्वार्चन, धर्म प्रबोधन, तुलाभार कार्यक्रम व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. १० ते १५ जानेवारी या पाच दिवशी राष्ट्रीय धर्म जागृती महासंमेलन, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन, राष्ट्रीय वीरशैवागम समावेश, तेलगू, मराठी, कन्नड भाषा बंधुत्व कार्यक्रम, भक्तनिवास ,हॉस्पिटल महासभामंडप, वसती शाळा, संस्कृत गुरुकुल यांचे पायाभरणी कार्यक्रम, हिंदी, इंग्रजी, तेलुगु भाषेत अनुवादित केलेले सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध मान्यवर येणार असल्याची माहिती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

Web Title: Dharma Jagruti Mahasamelan in January; Deputy Chief Minister Fadnavis will attend the Shreeshail Peetha program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.