बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 09:09 PM2023-06-17T21:09:56+5:302023-06-17T21:11:10+5:30

दरम्यान, नारायण घोलप व काशिनाथ नरोटे (रा दडशिंगे) अशी मृत झालेल्ल्यांची नावे आहेत

Barshi Solapur road accident; Both died on the spot in the accident | बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी: बार्शीसोलापूर रस्त्यावर उड्डाणपूलजवळ दुचाकी गाडी आणि माल ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.

दरम्यान, नारायण घोलप व काशिनाथ नरोटे (रा दडशिंगे) अशी मृत झालेल्ल्यांची नावे आहेत. हे दोघे एमएच 13 AP-2662 या दुचाकी गाडीवरून गावाकडे निघाले होते. यादरम्यान सोलापूर वरून येत असलेल्या मालट्रक (MH 45 -AS 2025) ने या दुचाकिला धडक दिल्याने  दुचाकी वरील दोघेजण जागी ठार झाले.  रस्त्यावर मृतदेह पडलेले होते. घटनेची माहिती काढतात तात्काळ बार्शी शहर पोलीस स्टेशनचे सपोनी ज्ञानेश्वर उदार, पीएसआय गजानन कर्णेवाड व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बार्शीपासून अपघात स्थानजवळच असल्याने रस्त्यावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.

Web Title: Barshi Solapur road accident; Both died on the spot in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.