पंढरपुरातील ‘भारतनानां’ ची हॅट्ट्रिक; पंतांच्या वाड्यावर सन्नाटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:45 PM2019-10-25T12:45:00+5:302019-10-25T12:47:18+5:30

Pandhrpur Vidhan Sabha Election Results 2019: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ : तीन निवडणुका, तीन पक्ष, तरीही भारत भालके झाले विजयी...

Baramati Election Results 2019: Bharat Bhalke vs sudhakarpant paricharak, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | पंढरपुरातील ‘भारतनानां’ ची हॅट्ट्रिक; पंतांच्या वाड्यावर सन्नाटा !

पंढरपुरातील ‘भारतनानां’ ची हॅट्ट्रिक; पंतांच्या वाड्यावर सन्नाटा !

googlenewsNext
ठळक मुद्दे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारत भालके हे तीन वेळा निवडणुका लढविल्यापंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावांतून आ़ भारत भालके यांनी ५ हजारांहून अधिक मतांची आघाडीमहायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना ७६ हजार ४२६ मते मिळाली

सतीश बागल

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारत भालके हे तीन वेळा निवडणुका लढविल्या, त्याही वेगवेगळ्या पक्षातून. तरीही त्यांनी यावेळची निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक साधली़ यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी पंतांच्या वाड्यावर सन्नाटा पसरला.

पंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावांतून आ़ भारत भालके यांनी ५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर निवडणुकीचा कल स्पष्ट झाला होता. शेवटपर्यंत आघाडी कायम राखत भालके हे १३ हजार ३६१ मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण ८९ हजार ७८७ इतकी मते मिळाली. महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना ७६ हजार ४२६ मते मिळाली. मंगळवेढा शहर व तालुक्यात दामाजी कारखान्याचे चेअरमन अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना ५४ हजार १२४ मते मिळाली. धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांना ७ हजार २३२ इतकी मते मिळाली. 

दरम्यान, पहिल्या फेरीपासून भालके हे आघाडीवर असल्याचे समजताच मतमोजणी केंद्रासमोरील रेल्वे मैदानावर राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यास प्रारंभ केला.

पहिल्या फेरीत पंढरपूर तालुक्यातील कौठाळी, शिरढोण, वाखरी, गादेगाव या गावांमधून भालके यांनी ८०४ मतांची आघाडी घेतली. ती त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली़ त्यामुळे त्यांना विजय संपादन करता आले़ प्रत्येक फेरीत ते आघाडी घेत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता, तर इकडे परिचारक गटामध्ये पुढच्या फेरीत आघाडी मिळेल, त्यापुढील फेरीत आघाडी मिळेल, अशी अपेक्षा शेवटपर्यंत कायम राहिली, अखेरपर्यंत त्यांना भालके यांची लीड तोडता आली नाही़ शेवटी पराभव स्वीकारावा लागला़ दुसरीकडे पंढरपूर शहर व तालुक्यातील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे तसेच काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे हे रेसमध्ये दिसले नाहीत. 
सुधाकरपंत परिचारक यांचे मूळ गाव असणाºया खर्डी तसेच आसपासच्या गावांमधून परिचारक यांना केवळ ७२० मतांची तर मंगळवेढा शहरात जुजबीच आघाडी मिळाली़ इतर ठिकाणी परिचारक यांना मोठी आघाडी मिळविता आली नाही. भालके यांचे मताधिक्य मात्र वाढत गेले. मंगळवेढा शहर व तालुक्यातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतामध्ये वाढ झाली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

आ़ भारत भालके हे विजयी होणार, असे स्पष्ट झाल्यानंतर मतदारसंघातील विविध गावांतून कार्यकर्ते मोटरसायकली, चारचाकी गाडीतून पंढरपूरकडे रवाना होऊ लागले़ या कार्यकर्त्यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढली. विजयी उमेदवार भालके यांची टेम्पोतून मिरवणूक काढण्यात आली. त्याची सांगत शिवाजी चौक येथे झाली.

आ़ भारत भालके हे २००९ ची निवडणूक रिडालोस, २०१४ साली काँग्रेसमधून तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीमधून निवडणूक लढले़ मात्र तीन निवडणुका, तीन पक्ष तरीही त्यांनी हॅट्ट्रिक साधल्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली़

मंगळवेढा समाधान आवताडेंच्या पाठीशी 
दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातून सर्वाधिक ४३ हजार ६५७ मते मिळाली. भारत भालके यांना ३७ हजार ७९५ तर सुधाकरपंत परिचारक यांना ३० हजार ३९ मते मिळाली. 

पावसाच्या पाण्यात मीडिया सेंटर
मतमोजणी सुरू असताना पावसाने हजेरी लावली. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटरमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. मतमोजणी केंद्रासमोरील रेल्वे मैदानावर चिखल झालेला असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

यामुळे मतमोजणीस विलंब
- मतमोजणी, सुरक्षेसाठी आलेल्या कर्मचाºयांसाठी उभारण्यात आलेल्या भोजन व्यवस्थेत विस्कळीतपणा आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना चांगलेच झापले. त्यांच्यामुळे मतमोजणीस काहीसा विलंब झाल्याचे दिसून आले. 

भगीरथ भालके, प्रणव परिचारक यांची उपस्थिती
- विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके तसेच खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक हे दोघे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरुवातीपासून उपस्थित होते. कार्यकर्त्यांकडून मतांची आकडेवारी घेण्यात येत होती. पंढरपूर शहर व तालुक्यातून भालके यांना मताधिक्य मिळाल्याचे समजताच परिचारक गटात सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. 

परिचारक यांच्या पराभवाची कारणे 

  • - राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली सहानुभूती.
  • - परिचारक गटात गावागावात असलेले अंतर्गत गट-तट. 
  • - थेट मतदारांशी कमी झालेला संपर्क. 
  • - कमळ या चिन्हावर निवडणूक लढविल्याने ग्रामीण भागातून अपेक्षित प्रतिसाद नाही. 

Web Title: Baramati Election Results 2019: Bharat Bhalke vs sudhakarpant paricharak, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.