अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

By शीतलकुमार कांबळे | Published: April 18, 2024 06:55 PM2024-04-18T18:55:57+5:302024-04-18T18:56:36+5:30

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले.

10 parrots died due to unseasonal rain in solapur | अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतपिकांचे मोठ नुकसान झाल आहे. त्याचबरोबर पक्षांना सुद्धा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येते अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू झाला.

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले. वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे निसर्गप्रेमी श्रीकांत चिंचकर यांनी याची माहिती दिली.  पावसाचा तडाका इतका जोरात होता की जागीच १० पोपट मरण पावले तर दोन पोपट जखमी झाले. जखमी पोपटांवर उपचार करून येत्या दोन दिवसात त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. 

फक्त पोपटच नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतर पक्षी सुद्धा मरण पावले आहेत. पक्ष्यांच्या घरटी विणीच्या हंगामाची साखळीही विस्कळीत झाल्याचे मत पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्यातून पिके तर उद्धवस्त झालीच, शिवाय पक्षीजीवनही उघड्यावर आले आहे. पावसाळ्यापूर्वी घरटी बांधण्याला सुरुवात केलेल्या अनेक पक्ष्यांची घरटी मोडून पडली आहेत. त्यामुळे या पक्षांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण झाला आहे असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

Web Title: 10 parrots died due to unseasonal rain in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.