Sindhudurg: चौकुळ येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, चौथी घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 5, 2024 03:47 PM2024-04-05T15:47:46+5:302024-04-05T15:57:21+5:30
महादेव भिसे आंबोली : चौकुळ येथील सिताराम गावडे (वय-७९) हे आज, शुक्रवारी घराच्याच मागे असलेल्या आपल्या शेतीमध्ये काम करण्यास ...
महादेव भिसे
आंबोली : चौकुळ येथील सिताराम गावडे (वय-७९) हे आज, शुक्रवारी घराच्याच मागे असलेल्या आपल्या शेतीमध्ये काम करण्यास गेले असता त्यांच्यावर अचानक गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
गव्याने गावडे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांनी आरडाओरडा केला. लोक जमा होताच गव्याने तेथून धूम ठोकली. जखमी सिताराम गावडे यांना वनविभागाच्या मदतीने सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकुळमध्ये गवाच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही महिन्यापूर्वी चौकूळ केगतवाडी येथे गव्हाच्या हल्ल्यात एक वृद्ध माणूस मृत्यूमुखी पडला होता. त्यामुळे वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. अधिक तपास आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके तथा वनविभागाचे कर्मचारी करत आहेत.