Maharashtra Assembly Election 2019 : वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ : सतीश सावंत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 02:11 PM2019-10-17T14:11:20+5:302019-10-17T14:12:41+5:30
आता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश सावंत यांनी दिला.
कणकवली : आता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश सावंत यांनी दिला.
कणकवली तालुक्यात सतीश सावंत यांचा प्रचारदौरा सुरू आहे. त्याअंतर्गत नरडवे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते संदेश पारकर, बाळा भिसे, रमाकांत सावंत, व्हिक्टर डिसोझा, जयराम ढवळ, गणेश ढवळ, सोमा घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांच्या नखालाही धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर गप्प बसणार नाही. येत्या काळात नरडवे धरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
आपल्याला केवळ कागदावरचा विकास नको, तर जनतेचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणारा विकास हवा आहे. नरडवे धरणाचे काम पूर्ण झाले तर शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे. यातून शेतकरी समृद्ध होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अॅड. हर्षद गावडे, संदेश सावंत-पटेल, माजी सभापती आबू पटेल, रंजन चिके, फोंडाघाट विभागप्रमुख संजना कोलते, मिनल तळगावकर, सुभाष सावंत, संतोष सावंत, उदय ठाकूर, अनिल पटेल, भाई पटेल आदी उपस्थित होते .
यावेळी नरडवे-राणेवाडी येथील स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये संतोष राणे, विजय राणे, रमेश राणे, शामसुंदर राणे, संचिता राणे, सायली राणे, शांताराम राणे, प्रतिमा राणे, विजया राणे, प्रभावती राणे, सुनंदा राणे, वामन राणे, काशिराम राणे, द्रौपदी राणे, प्रसाद भालेकर आदी ग्रामस्थांना शिवबंधन बांधत त्यांचे सावंत यांनी पक्षात स्वागत केले.
राग-रूसवे दूर करून कामाला लागा
फोंडाघाट येथे प्रचारसभेत सतीश सावंत म्हणाले, तुम्ही सर्वांनी ह्यमी सतीश सावंतह्ण असे समजून काम करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आता शक्य होणार नाही. मात्र, राग-रुसवे दूर करून कामाला लागा. माझ्यासाठी आठ दिवस काम करा, मी तुमच्यासाठी पाच वर्षे काम करेन. शिवसेनेची निशाणी मतदारांच्या मनात रुजवा. त्यासाठी दिवस-रात्र एक करून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.