वणव्याने घेतला दोन मुक्या जिवांचा बळी, वाईत वणव्याच्या घटना वाढल्या

By दीपक शिंदे | Published: March 11, 2024 03:33 PM2024-03-11T15:33:56+5:302024-03-11T15:34:18+5:30

वाई : वाई तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. त्याचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अज्ञात ...

Two animals were killed in the wildfire in wai satara | वणव्याने घेतला दोन मुक्या जिवांचा बळी, वाईत वणव्याच्या घटना वाढल्या

वणव्याने घेतला दोन मुक्या जिवांचा बळी, वाईत वणव्याच्या घटना वाढल्या

वाई : वाई तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. त्याचे दुष्परिणाम दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. अज्ञात विघ्नसंतोषी मंडळींनी लावलेल्या वणव्यात पिराचीवाडी येथील एका शेतकऱ्याचा जनावरांच्या गोठ्याला धग लागून दोन मुक्या जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. पसरणीचा डोंगर, मांढरदेवचा डोंगर, वैराटगडाचा डोंगर असे डोंगर पेटून काळे ठिक्क पडत आहेत. ते वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. असे असतानाच वाईच्या उत्तर बाजूला असलेल्या धावडी गावालगतच्या डोंगरावर अज्ञात व्यक्तींकडून रविवारी दुपारी वणवा लावण्यात आला. तो वणवा वाऱ्याच्या वेगाने भडकला. 

वणव्याने वाळलेल्या गवताबरोबरच सागाची, शिवरीची झाडे कवेत घेत रौद्र रूप धारण केले. वणव्याची दाहकता वाढत होती. हा वणवा त्याच गावालगत असलेल्या पिराचीवाडी येथील दशरथ कोचळे यांच्या जनावराच्या गोठ्याजवळ पोहोचला. आगीच्या ज्वाळांनी गुरांचा गोठा वेढला गेला. घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु गोठ्यातील एक खोंड आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वाई वनविभागाकडून वणवा आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

Web Title: Two animals were killed in the wildfire in wai satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.