कास पठार परिसरात दुर्मिळ रानगवे, पर्यटकांची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:53 PM2019-08-16T12:53:52+5:302019-08-16T12:54:40+5:30

सातारा शहराच्या पश्चिमेला २५ कि मी अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांची पर्वणीच ठरत आहे.

Rare runway in the Cass Plateau area, | कास पठार परिसरात दुर्मिळ रानगवे, पर्यटकांची पर्वणी

कास पठार परिसरात दुर्मिळ रानगवे, पर्यटकांची पर्वणी

Next
ठळक मुद्देकास पठार परिसरात दुर्मिळ रानगवेपर्यटकांची पर्वणी

सातारा  : शहराच्या पश्चिमेला २५ कि मी अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांची पर्वणीच ठरत आहे.

बैल कुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असुन कास परिसरातील दाट , घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधुन बोलले जाते. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठयाच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. अन्नाच्या शोधात या कळपाची वाटचाल या परिसरात होत आहे.

सातारा जिल्हयातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. येथील निसर्गसौंदर्य, चोहोंबाजुला हिरवीगार दाट झाडी., निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांचे वारंवार झुंड दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडते.

Web Title: Rare runway in the Cass Plateau area,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app