Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 07:13 PM2023-11-07T19:13:43+5:302023-11-07T19:15:32+5:30

सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

Illegal sale of Goa-made liquor in Maharashtra bottles; three arrested in sangli | Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक 

Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक 

दिलीप मोहिते 

विटा : गोवा बनावटीची विदेशी दारू महाराष्ट्र राज्यातील विदेशी मद्याच्या बाटलीत भरून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सावळज (ता.तासगाव) येथील हॉटेल फिनिक्सवर विटा उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यावेळी गोवा बनावटीची दारू, बॉटलिंग उपकरण, बाटल्यांची बनावट झाकणे यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याप्रकरणी विनोद विठ्ठल माने (वय ३७, रा. माने वस्ती येळावी, ता.तासगाव), सुशांत अशोक गायकवाड (२७, रा. गायकवाड मळा, बस्तवडे, ता. तासगाव) व गणेश मालोजी शिंदे (२४,  रा. दहिवडी, ता.तासगाव) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली.

विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे यांना सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यात विक्री होणाऱ्या बाटलीत भरून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विटा उत्पादन शुल्कच्या पथकाने सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या पथकाला हॉटेलच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये तसेच किचन भट्टीला लागून असलेल्या भूमिगत पाण्याच्या रिकाम्या टाकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ८९४ व मोठ्या ७५० मिलीच्या १५० बाटल्या सापडल्या.

त्यावेळी पथकाने झडती घेतली असता बॉटलींग उपकरणे, बाटल्याची बनावट बुचे, गोव्याची दारू भरण्यासाठी आणलेल्या व महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या रिकाम्या ७२ बाटल्या, मोबाईल, गाळणी, प्लॉस्टिक कॅन यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विनोद माने, सुशांत गायकवाड व गणेश शिंदे या तीन संशयितांना अटक केली. विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे, प्रशांत रासकर,  सुनिल पाटील, श्रीमती माधवी गडदरे, अजय वाघमारे, दुय्यम निरीक्षक दिलीप सानप, उदय पुजारी, जवान सचिन सावंत, प्रमोद सुतार, रणधीर पाटील, अमित पाटक्षल, अर्जुन कोरवी यांनी ही कारवाई केली. निरीक्षक सुनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Illegal sale of Goa-made liquor in Maharashtra bottles; three arrested in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.