रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर आता कॅमेऱ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:22 PM2020-09-15T12:22:50+5:302020-09-15T12:24:22+5:30

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

Now the camera looks at the traffic in Ratnagiri city | रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर आता कॅमेऱ्याची नजर

रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर आता कॅमेऱ्याची नजर

Next
ठळक मुद्देवाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई यंत्रणेचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते. या अत्याधुनिक कॅमेराद्वारे शहरातील मारुती मंदिरपासून सुमारे जुना माळनाकापर्यंत अंतरावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर याद्वारे कारवाई केली जाणार आहे. नाक्यावर पोलीस नसले तरी वाहनचालकांना शिस्तीतच जावे लागणार आहे.

हळूहळू अशा पद्धतीने शहराच्या मुख्य नाक्यांवर हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासही पोलिसांना मदत मिळणार आहे. सीसीटीव्ही बेस ई - चलानाची सोय आहे. शहरात १२ ठिकाणी असे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Web Title: Now the camera looks at the traffic in Ratnagiri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.