रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी

By शोभना कांबळे | Published: May 7, 2024 12:11 PM2024-05-07T12:11:46+5:302024-05-07T12:12:17+5:30

सकाळी ७ ते ११ या कालावधीत सर्वाधिक मतदान चिपळूण विधानसभा मतदार संघात झालं.

21 19 percent polling per hour in Ratnagiri Sindhudurg constituency highest in Chiplun Less percentage in Ratnagiri | रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात २१.१९ टक्के मतदान, चिपळूणात सर्वाधिक; रत्नागिरीत कमी टक्केवारी

रत्नागिरी :  लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१९ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ ते ११ या कालावधीत सर्वाधिक मतदान चिपळूण विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी १५ टक्के मतदान रत्नागिरीत झाले आहे. 

पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले होते. पुढील दोन तासात १३.०२ टक्के मतदान वाढले आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २४.१८ टक्के मतदान झाले. रत्नागिरीत सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात केवळ १५ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात २३.६३ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात २२.०९ टक्के, कुडाळ मतदारसंघात २१.०४ टक्के आणि सावंतवाडी मतदार संघात २१.७४ टक्के मतदान झाले आहे.

Web Title: 21 19 percent polling per hour in Ratnagiri Sindhudurg constituency highest in Chiplun Less percentage in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.