या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 08:35 AM2024-04-07T08:35:34+5:302024-04-07T08:39:58+5:30

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यासह अन्य नेते झटून प्रचार करीत आहेत.

Why will Congress open an account even in this election?; BJP won all 25 seats in last two elections | या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा

या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा

विलास शिवणीकर

जयपूर : राजस्थानात गत दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या जागा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर, काँग्रेस यंदा तरी खाते उघडणार काय, याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यासह अन्य नेते झटून प्रचार करीत आहेत. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसनेही कंबर कसली आहे. गत दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेत बहुतांश जागेवर काँग्रेसने नवीन चेहरे दिले आहेत. निवडणुकीच्या रणनीतीत बदल केला आहे. 
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना संघटनेचा आणि निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे. यंदा संघटनेसोबतच सरकारमध्ये ते असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. राज्यासाठी स्टार प्रचारक म्हणून त्यांचाच चेहरा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत तीनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत. राज्याची जबाबदारी गेहलोत यांच्याकडेच आहे. पण, त्यांच्याच जिल्ह्यात जोधपूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत सध्या जोधपूरमधून खासदार आहेत. ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. 
केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे सातत्याने बिकानेरमधून लोकसभा निवडणूक लढत आलेले आहेत. पश्चिम राजस्थानातील भाजपचा ते एक मोठा चेहरा आहेत. 
केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी बाडमेर- जैसलमेरचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत बाडमेर जिल्ह्यात दोन ठिकाणी अपक्ष विजयी झाले आहेत. 
एका आमदाराला पक्षाने नंतर सोबत घेतले आहे; पण अन्य अपक्ष आमदार
रवींद्रसिंह भाटी यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करीत चौधरी यांची चिंता वाढविली आहे

प्रदेशाध्यक्षांसमोर दुहेरी आव्हान
nभाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी चित्तोडगडमधून खासदार आहेत. यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नेतृत्वातच पक्ष विधानसभा निवडणूक जिंकला आहे.
nजोशी यांच्यापुढे दुहेरी आव्हान आहे. ते स्वत:ही रिंगणात आहेत आणि इतर उमेदवारांच्या निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Web Title: Why will Congress open an account even in this election?; BJP won all 25 seats in last two elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.