सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:54 AM2024-04-23T07:54:39+5:302024-04-23T07:55:41+5:30

भारत आदिवासी पार्टीचे मांगीलाल मीणा तसेच बसपा व अन्य काही अल्पसंख्याक उमेदवाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.

Loksabha Election 2024 - C.P. Joshi tough challenge to Congress this year; Who will win in Chittaurgarh? | सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

विलास शिवणीकर

चित्तौडगड : राजस्थानातील चित्तौडगड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी विजयाची हॅट्ट्रिक करणार काय? याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते उदयलाल आंजना यांना रिंगणात उतरविल्याने ही लढत तुल्यबळ झाली आहे. 

माजी संरक्षणमंत्री जसवंत सिंह यांचा १९९८ मध्ये आंजना यांनी पराभव केला होता. यंदाची निवडणूक सी. पी. जोशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ते प्रदेशाध्यक्ष असले तरी  मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसून येत आहे. चित्तौडगड मतदारसंघातील आठपैकी ६ विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. एका जागेवर काँग्रेस आणि एका मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत. भारत आदिवासी पार्टीचे मांगीलाल मीणा तसेच बसपा व अन्य काही अल्पसंख्याक उमेदवाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.

काय आहेत कळीचे मुद्दे 
तरुणांसाठी रोजगार, पर्यटनाच्या दृष्टीने मतदारसंघात विकास हे स्थानिक मुद्दे काँग्रेसने प्रचारात उचलून धरले आहेत. 
या मतदारसंघात गुलाबचंद कटारिया, वसुंधरा राजे आणि चंद्रभान आक्या या ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव आहे. मात्र, आक्या आणि सी.पी. जोशी यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड शो, भाजप नेत्यांचे दौरे त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापलेले आहे.

२०१९ मध्ये काय घडले ?

सी. पी. जोशी 
भाजप (विजयी) 
९,८२,९४२

गोपाल सिंह शेखावत
काँग्रेस (पराभूत) 
४,०६,६९५

Web Title: Loksabha Election 2024 - C.P. Joshi tough challenge to Congress this year; Who will win in Chittaurgarh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.