हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली भारतीय लष्कराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:46 AM2024-02-29T07:46:36+5:302024-02-29T07:46:50+5:30

राजस्थान गुप्तचर खाते आणि लष्करी गुप्तवार्ता खात्याने ही संयुक्त कारवाई केली.

Caught in a honeytrap, the information of the Indian Army was given to Pakistan | हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली भारतीय लष्कराची माहिती

हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली भारतीय लष्कराची माहिती

जयपूर : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असलेल्या बिकानेर येथील विक्रम सिंग या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो डुंगरगड तालुक्यातील लाखासर क्षेत्रातील बास या गावातील रहिवासी आहे. राजस्थान गुप्तचर खाते आणि लष्करी गुप्तवार्ता खात्याने ही संयुक्त कारवाई केली.

गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय अग्रवाल म्हणाले की, पाकच्या गुप्तचर संस्थांकडून केल्या जाणाऱ्या हेरगिरीच्या कारवायांवर राजस्थान गुप्तचर खाते सतत नजर ठेवून होते. यातूनच सिंग याला अटक करण्यात आली. विक्रम हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले. सोशल मीडियाद्वारे पाक महिला एजंट्सच्या संपर्कात राहून तो सीमेवरील महत्त्वाची माहिती तिला देत होता.

पाकिस्तानला काय दिली माहिती?
nआरोपी विक्रम हा अनेक दिवसांपासून आर्मी एरिया महाजन बिकानेरमध्ये कॅन्टीन चालवत होता. तो पाकिस्तानी गुप्तहेर अनिताच्या वर्षभर संपर्कात होता.
nविक्रम हा लष्करी क्षेत्राची संवेदनशील माहिती जसे की प्रतिबंधित क्षेत्रांची छायाचित्रे, स्थान आणि व्हिडीओ, युनिट्स आणि अधिकाऱ्यांची तिला उपलब्ध करून देत होता.

Web Title: Caught in a honeytrap, the information of the Indian Army was given to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.