'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:25 AM2024-04-24T11:25:02+5:302024-04-24T11:28:04+5:30

Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | 'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा सुरू आहेत. काल महाविकास आघाडीची रायगडच्या मोर्बा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी शेकापच्या जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी ऐतिहासिक काम केलं आहे, शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येत नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. 

भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

" पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं. नको तेवढ दिलं. पण, आजचा पेपर वाचल्यानंतर मी चलबिचल झालो. अजित पवार बोलायला लागले की मी निवडणूक झाल्यावर सांगतो. साहेब निवडणूक झाल्यानंतर त्यांची एकही शीट येत नाही. आघाडीच्या प्रचंड मतांनी शीटा येत आहेत.  गद्दारांच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनता निवडून देत नाही,  अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

"निवडणूक झाल्यानंतर परत येतील, आल्यावर रडतील डोळे पुसतील. पण, यांना परत कधी दारात उभं करु नका, असंही जयंत पाटील म्हणाले. आमच्या आघाडीत मतभेद जरुर आहे. पण देशासाठी एकत्र झाले आहोत, असंही जयंत पाटील म्हणाले. आम्ही कधीही जातीमध्ये तेढ होऊ दिला नाही, अल्पसंख्यांकांची संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या विचारातून आम्ही वाढले आहोत, असंही पाटील म्हणाले. अंतुले साहेबांच्या विरोधात आम्ही लढायचो त्यांना आम्ही चारवेळा पाडले. पण ते लगेच आमच्याकडे यायचे ही त्यांची दानत आहे, अंतुले यांनी विकास केला काहीजण म्हणतात आम्ही विकास केला, असा टोलाही पाटील यांनी सुनिल तटकरे यांच्यावर लगावला. 

Web Title: lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.