पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात

By वैभव गायकर | Published: September 7, 2023 04:17 PM2023-09-07T16:17:12+5:302023-09-07T16:17:21+5:30

शेकडो वर्षाची परंपरा कायम

Historical Dahi Handi of Panvel's Bapat Wada at Ballaleshwar temple this year | पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात

पनवेलची बापट वाड्याची ऐतिहासिक दहीहंडी यावर्षी बल्लालेश्वर मंदिरात

googlenewsNext

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: देशभरात गोपाळकाला व जन्माष्टमीची धूम गुरुवार दि.7 रोजी पाहावयास मिळाली. पनवेलमध्ये सुमारे 280 वर्षांपेक्षा जास्त काळापासून साजरी करण्यात येत असलेली दहीहंडी आहे. पेशवेकाळापासून बापट कुटुंबीय हा उत्सव पनवेलमधील सर्व रहिवाशांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.बापट वाडा जरी काळाच्या पडद्याआड गेल्याने हा उत्सव वडाळे तलावाजवळील बल्लाळेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला.

या दहीहंडीला ऐतिहासिक महत्त्व असून 1730 पासून हा सण परंपरेनुसार आजही सुरू आहे.1720 मध्ये बाळाजीपंत बापट आपल्या कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी बापटवाडा या ठिकाणी पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी  देव-देवतांची अभिषेक करून त्यांची सजावट केली जाते. आदल्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्र म भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठ आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. या ठिकाणची दहीहंडी ही मोठ्या उंचीवर बांधली जात नाही. ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात.

गोलाकार जमलेल्या या गोपाळांवर जाड्या दोरखंडाची उपट मारली जाते. हादेखील एक परंपरेचाच भाग असल्याचे बोलले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. शेकडो वर्षे ही परंपरा सुरू असल्याने अनेक जण मोठ्या उत्साहात ही दहीहंडी बघण्यासाठी जमत असतात. सध्याच्या दहीहंडीला मॉडर्न स्वरूप प्राप्त झाले असताना, ही पारंपरिक दहीहंडी, संस्कृतीचे दर्शन घडविणारा दहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जात आहे.

बापट वाडा मोडकळीस आल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून तो जमीनदोस्त करण्यात आला असला तरी शेकडो वर्षाची दहीहंडीची परंपरा मात्र आजही पनवेल करांनी जपली आहे.

Web Title: Historical Dahi Handi of Panvel's Bapat Wada at Ballaleshwar temple this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.