महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी भोवली; कामोठ्यात झेंड्याला लागली आग 

By वैभव गायकर | Published: April 29, 2024 05:47 PM2024-04-29T17:47:41+5:302024-04-29T17:48:09+5:30

बारणे हे आपल्या प्रचार वाहनाने प्रचार करीत असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके लावले.

During the Mahayuti election campaign, fireworks were set off A flag caught fire in Kamoth | महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी भोवली; कामोठ्यात झेंड्याला लागली आग 

महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी भोवली; कामोठ्यात झेंड्याला लागली आग 

पनवेल : कामोठ्यात रविवारी रात्री मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार दरम्यान कार्यकर्त्यांनी केलेल्या आतिषबाजीत सेक्टर 7 येथील चौकात शिवप्रेमींनी लावलेल्या झेंड्याने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. बारणे हे आपल्या प्रचार वाहनाने प्रचार करीत असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके लावले. यापैकी एक फटका या चौकात वर लावलेल्या भगव्या झेंड्यावर धडकला यामुळे झेंड्याने त्वरित पेट घेतला.

दरम्यान, हा झेंडा जळत असताना चौकात वाहतूक सुरूच असल्याने पेट घेतलेल्या झेंड्याचे तुकडे खाली पडत होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाला नसला तरी या आगीच्या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्रचारात महायुतीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे हा प्रसंग ओढावल्याने नेत्यांनी देखील या कार्यकर्त्यावर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे पहावयास मिळाले. झेंडा जळाल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

Web Title: During the Mahayuti election campaign, fireworks were set off A flag caught fire in Kamoth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.