साहेब, होर्डिंगवर कारवाई करायची आहे, मार्गदर्शन करा! PMRDA चा राज्याच्या नगरसचिवांशी पत्रव्यवहार

By नारायण बडगुजर | Published: May 16, 2024 06:10 PM2024-05-16T18:10:59+5:302024-05-16T18:14:14+5:30

मुंबई येथे होर्डिंग्ज कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येथे देखील होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला होता...

Sir, want to take action on hoarding, guide! Correspondence of PMRDA with Municipal Councilors of the State | साहेब, होर्डिंगवर कारवाई करायची आहे, मार्गदर्शन करा! PMRDA चा राज्याच्या नगरसचिवांशी पत्रव्यवहार

साहेब, होर्डिंगवर कारवाई करायची आहे, मार्गदर्शन करा! PMRDA चा राज्याच्या नगरसचिवांशी पत्रव्यवहार

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, आकाश चिन्ह, बॅनर, फ्लेक्स हटवण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा खुली करता आली नाही. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निविदा खुली करून अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यासाठी कार्यादेश देता यावा, यासाठी पीएमआरडीए प्रशासनाकडून राज्याच्या नगरविकास सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.    

मुंबई येथे होर्डिंग्ज कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येथे देखील होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून पीएमआरडीए हद्दीतील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर पीएमआरडीए प्रशासनाने आकाश चिन्ह परवाना कक्ष कार्यान्वित केला. विकास परवानगी विभागांतर्गत या कक्षाचे कामकाज चालते. या कक्षातर्फे मार्चमध्ये होर्डिंगचे सर्वेक्षण झाले. त्यात १०५७ होर्डिंगचे सर्वेक्षण झाले. त्या सर्व हाेर्डिंग, बॅनर, फ्लेक्सवाल्यांना नोटीस बाजवल्या आहेत. त्यापैकी ४७२ जणांना हाेर्डिंगवर कारवाईबाबत अंतिम नोटीस दिली आहे. 

पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, हाेर्डिंगचे सांगाडे वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाने देखील तांत्रिक बाब म्हणून जिल्ह्याचे निवडणूक विभाग प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांकडे निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत परवानगी मागितली. मात्र, हा विषय राज्याच्या नगर सचिवालयांतर्गत येत असल्याने त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे सूचित करण्यात आले. त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाने राज्याच्या नगरसचिवांकडे निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली आहे. निविदा खुल्या करून कार्यादेश देणे आवश्यक आहे. मात्र, आचारसंहिता असल्याने तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. राज्याच्या नगर सचिवांकडून आलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

तीन वेळा राबवली निविदा प्रक्रिया  

अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्स हटविण्यसाठी पीएमआरडीएकडून ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. दोनदा निविदा प्रसिद्ध केली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या. त्याला प्रतिसाद मिळून तीन निविदाधाकर पात्र झाले. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने निविदा खुल्या करता आल्या नाहीत.    

मुळशीत ३८६ तर हवेलीत २३१ होर्डिंग 

पीएमआरडीएच्या हद्दीमधील नऊ तालुक्यांपैकी सर्वाधिक होर्डिंग फ्लेक्स हे मुळशी तालुक्यात आहेत. या परिसरात ३८६ फ्लेक्स असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्यापाठोपाठ हवेली तालुक्यात २३१ तर, शिरूर तालुक्यात १२०, भोर तालुक्यात १११ होर्डिंग फ्लेक्स आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये १० तर सर्वात कमी वेल्ह्यामध्ये एक फ्लेक्स होर्डिंग आहे. 

अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आचारसंहिता असल्याने राज्याच्या नगरसचिवांकडे मार्गदर्शनाबाबत पत्रव्यवहार केला आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत तत्काळ मंजुरी मिळवून अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येईल.

- सुनील मरळे, महानगर नियोजनकार, विकास परवानगी विभाग, पीएमआरडीए

Web Title: Sir, want to take action on hoarding, guide! Correspondence of PMRDA with Municipal Councilors of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.