महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:50 PM2019-10-24T20:50:00+5:302019-10-24T20:50:01+5:30

Pune Election result 2019 : जिल्ह्यातील सर्वांत पहिला निकाल

Maharashtra Election Result 2019 : NCP's Chetan Tupe won in Hadapsar | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

googlenewsNext

पुणे :  हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार चेतन तुपे यांनी भाजपचे विद्यामान आमदार योगेश टिळेकर यांचा २ हजार ८२० मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणला. या मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांना ३४  हजार ८०९ मते घेऊन मतदार संघातील अस्तित्व दाखून दिले. दरम्यान भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना मोठा धक्का मानला जातो.
    हडपसर विधानसभा मतदार संघात यंदा भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँगे्रसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. या तीन प्रमुख उमेदवारांसह वंचितचे घनशाम हक्के यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कोरेगाव पार्क येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीतच चेतन तुपे यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरी पासून घेतलेली आघाडी तुपे यांनी शेवटच्या फेरी पर्यंत कायम ठेवली.  पहिल्या चार फे-यांमध्ये तुपे यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरी दरम्यान कमी होऊन टिळेक यांनी अनपेक्षित पणे ५०० मतांनी आघाडी घेतली. सहाव्या फेरीमध्ये देखील तुपे यांच्या पेक्षा टिळेकर यांना अधिक मते मिळाली.  यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु भाजपा कार्यकर्त्यांचा हा आनंद क्षणिकच ठरला. राष्ट्रवादीच्या चेतन तुपे आठव्या फेरीमध्येच तब्बल १ हजार ६८३ मतांची आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली. दरम्यान दहा, आकरा आणि बाराव्या फेरी दरम्यान टिळेकरांनी तुपे यांनी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु फार यश मिळाले नाही. तेराव्या फेरीमध्ये हडपसर गावठाण परिसराची मतमोजणी सुरु झाल्यानंतर येथे  तुपे बहुतेक सर्व मतदान केंद्रावर वनसाईड मते घेतली. या भागात तुपे यांना तब्बल ५ हजार ३७५ मते मिळाली तर टिळेकर यांना केवळ २ हजार ९३१ मते मिळाली. तर कात्रज परिसरामध्ये वसंत मोरे आणि टिळेकर यांनाच चांगले मतदान झाल्याचे निकालावरुन स्पष्ट होते. या परिसरात म्हणजे २० व्या फेरीदरम्यान वसंत मोरे यांना तब्बल ५ हजार ८५८ मते मिळाली, तर तुपे यांना केवळ १ हजार ३१० मते मिळाली. येथे टिळेकर यांनी चांगली टक्कर दिली तरी तुपे यांचे मताधिक्य कमी करण्यात फार यश आले नाही. चेतन तुपे यांनी १९ व्या फेरी अखेर घेतलेली तब्बल १० हजार ३३७ मतांची आघाडी टिळेकर यांनी अखेरच्या दोन फे-यांमध्ये मोठे मताधिक्य म्हणजे ७ हजार ५९४ घेतली. परंतु अखेरच्या फेरीपर्यंत टिळेकरांना तुपे यांचे लिड तोडणे शक्य झाले नाही. यामुळेच अखेरच्या फेरी अखेर चेतन तुपे ९२ हजार ३२६ मते, योगेश टिळेकर ८९ हजार ५०६ मते आणि वसंत मोरे यांना ३४ हजार ८०९ मते मिळाली. यामध्ये तुपे २ हजार ८२० मतांनी विजयी झाले. 
----------------------
जिल्ह्यातील सर्वांत पहिला निकाल
जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदार संघ सर्वांत मोठ मतदार संघ असून, तब्बल ५ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी मतमोजणीचे अत्यंत नेटके नियोजन केल्याने १२ वाजताच राष्ट्रवादी काँगे्रसचे चेतन तुपे यांचा  विजय घोषित करुन जिल्ह्यातील सर्वात पहिला निकाल जाहीर केला. तुपे यांच्या विजयांनी  राष्ट्रवादी काँगे्रसची जिल्ह्यातील विजयाची घोडदौड सुरु झाली.
--------------------------------
हडपसर विधानसभा मतदार संघात उमेदवारांना पडलेली मते
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँगे्रस) : ९२ हजार १४४ (विजयी)
योगेश टिळेकर (भाजपा) : ८९ हजार ५०६
वसंत मोरे (मनसे ) : ३४ हजार ८०९
जाहिद इब्राहिम शेख (अपक्ष): ७ हजार ९०१
घनशाम हक्के (वंचित ) : ७ हजार ५७०
नोटा : २ हजार ४७४
----------------------
विधानसभा सन २०१४ निवडणुकीचा निकाल 
योगेश टिळेकर (भाजपा) : ८२ हजार ६२९ (विजयी)
महादेव बाबर (शिवसेना) : ५२ हजार ३८१
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँगे्रस) : २९ हजार ९४७
नाना भानगिरे ( बंडखोर) : २५ हजार २०६
बाळासाहेब शिवरकर (काँगे्रस) : २२१००

Web Title: Maharashtra Election Result 2019 : NCP's Chetan Tupe won in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.