मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: May 11, 2024 02:54 PM2024-05-11T14:54:09+5:302024-05-11T14:54:59+5:30

याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे....

Friendship turned into love, a minor girl was sexually assaulted by luring her into marriage | मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल

मैत्रीचं प्रेमात रुपांतर, १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर; गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलीची एका १९ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डिसेंबर २००२३ ते मे २०२४ या कालावधीत हडपसर परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत १५ वर्षीय मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.१०) फिर्याद दिली आहे. यावरून रोहन राजेंद्र गायकवाड (१९, रा. भेकराई नगर, हडपसर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची ओळख पीडित मुलीच्या मैत्रिणीमार्फत जून २०२३ मध्ये झाली.

पीडित मुलगी आणि आरोपी रोहन यांच्यात ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रोहन आणि पीडित मुलगी पुणे शहरातील एका गार्डन मध्ये व मुलगी राहत असलेल्या परिसरात एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर आरोपीने हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये मुलीला घेऊन गेला. त्याठिकाणी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेळोवेळी मुलीसोबत संबंध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बर्गे करत आहेत.

Web Title: Friendship turned into love, a minor girl was sexually assaulted by luring her into marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.