महाशिवरात्री निमित्त पीएमपीच्या महत्वाच्या बसस्थानकांवरून जादा बसेस
By भाग्यश्री गिलडा | Published: March 7, 2024 02:38 PM2024-03-07T14:38:36+5:302024-03-07T14:39:41+5:30
निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
पुणे : महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. ०८) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातून तसेच उपनगरातून निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्शवभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाकडून बसस्थानकांवरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
- कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजेपासून २० मिनिटांच्या वारंवारितेने २ जादा आणि पर्यायी बसमार्ग क्रमांक ६१, २९३, २९६ व २९६-अ या मार्गांवर ११ बसेस उपलब्ध असणार आहेत.
- स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव) येथे जाण्यासाठी पहाटे साडेतीन वाजेपासून १५ ते २० मिनिटांच्या वारंवारितेने १२ जादा व पर्यायी बसमार्ग क्रमांक ५२-अ या मार्गावर २ नियमित व जादाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्यासाठी पहाटे सव्वापाच वाजेपासून १० ते १५ मिनिटांच्या वारंवारितेने पर्यायी बसमार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ५ मार्गांवर एकूण २० बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.