शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

By नितीन चौधरी | Published: April 25, 2024 06:00 PM2024-04-25T18:00:35+5:302024-04-25T18:01:10+5:30

कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार

Center permits production of ethanol from remaining B heavy crops 700 crores of crops, relief to the factories | शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; ७०० कोटींची मळी पडून, कारखान्यांना दिलासा

पुणे : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखान्यांकडे पडून असलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या मळीपासून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार असून यापासून सुमारे २ हजार ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. यातून उसबिलापोटीची शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी कारखान्यांना मदत होणार आहे.

देशातील साखरेची उपलब्धता घटेल या शक्यतेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ७ डिसेंबरला उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तातडीने याचे गांभीर्य केंद्र सरकारच्या नजरेस आणून दिले. त्यानुसार केंद्र सरकारने १५ डिसेंबरच्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली. यामुळे १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविता आली.

७०० कोटींची मळी होती पडून

मात्र, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक ,गुजरात,तामिळनाडू या राज्यांमधील उसाला फायदा होऊन पूर्वीच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनांनी साखरेची उपलब्धता वाढली. सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी आणि त्या आधारे देशभरातील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे ७ लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याबाबत महासंघाने केंद्र सरकारला दिले. या मळीची किंमत सुमारे ७०० कोटी रुपये आहे. बंदीमुळे या मळीचा वापर करता येत नव्हता पर्यायाने कारखाने अडचणीत आले होते. महासंघाच्या पत्रानंतर केंद्र सरकारने या मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यास अखेर परवानगी दिली असून आसवानीनिहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे देण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे बी हेवी मळीच्या शिल्लक साठयांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयाची रक्कम मोकळी होणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २ हजार ३०० कोटी रुपये इतकी रक्कम देशभरातील कारखान्यांना उपलब्ध होणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाचे बिल वेळेत व पूर्णपणे होण्यात मोठी मदत होईल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

Web Title: Center permits production of ethanol from remaining B heavy crops 700 crores of crops, relief to the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.