Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:31 PM2024-04-17T21:31:31+5:302024-04-17T21:34:41+5:30

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 Ajit Pawar criticized on supriya sule | Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात सभा घेतली. यावेळी अजितदादांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच प्रतिभा पवार यांच्यावरही भाष्य केले. 

ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

"बारामती लोकसभा मतदारसंघात फक्त फॉर्म भरल्यानंतर एक सभा व्हायची, इतर मान्यवरांना इथं फिरायालाही लागत नव्हतं. आता माझा परिवार सोडून माझा राहिलेला परिवार माझ्याविरोधात फिरतोय. पायाला भिंगरी बांधल्यासारख्या सभा घेत आहेत, त्या संदर्भात काहीही बोलत आहेत. याआधी कधी ढुंकूनही बघितलं नाही, काल परवा तर प्रतिभा काकी प्रचाराला दिसल्या, मी तर कपाळावरच हात मारला. काकी १९९० पासून कधी प्रचाराला आलेल्या मी पण बघितलं नाही आणि तुम्हीही बघितलं नाही, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! 

बारामतीमध्ये वकिलांच्या संघटनेने आयोजित केलेल्या सभेला अजित पवार बोलत होते. तुम्हाला वाईट वाटेल चार वेळा मुख्यमंत्री झाले असताना विकासकामे किती झाली आणि चार वेळा मी उपमुख्यमंत्री असतानाची विकासकामे ही तुमच्या डोळ्यादेखत कुणी केली हे तुम्हाला माहित आहे. त्याकाळामध्ये फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची मात्र आता माझे सर्व भावंड पायला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आता तर काकी (प्रतिभा पवार) प्रचार करताना मला सांगण्यात आले, मी तर डोक्यालाचा हात लावला, असे अजित पवार म्हणाले. 

बारामतीत लोकांचा अंदाज घेतला त्यावेळी लोकसभेला इकडे आणि विधासभेला तिकडे असे लोकांचे म्हणणे होते. पण मी ठरवले आता हे बदलले पाहिजे आणि हा निर्णय घेतला. लोकसभेला सुनेत्रा अजित पवार उमेदवार दिला. मुलाचा, नातवंडाचा, महिलांचा विचार करा भावनिक होऊ नका देशात हवा मोदींची आहे. गुंडगिरी होऊ दिली नाही. कोयता गँग होऊ दिली नाही. महिलांना सुरक्षित ठेवले, आता मला एवढ्या वेळेस मत द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले.  

Web Title: Baramati Lok Sabha Election 2024 Ajit Pawar criticized on supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.