बारामती निवडणूक निकाल: पुन्हा अजितदादांची पाचव्या फेरी अखेर ३१ हजार मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:08 AM2019-10-24T10:08:43+5:302019-10-24T10:15:21+5:30
Pune Vidhan Sabha Elcection Result 2019 : धनगर समाजाचे नेते म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले गोपीचंद पडळकर यांना भाजपाने बारामतीच्या रिंगणात उतरवून ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
पुणे : गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील यावेळच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. बारामतीतून विजयाचा षटकार ठोकण्याच्या इराद्यानेच अजित पवार यावेळी मैदानात उतरले आहेत. परंतु, धनगर समाजाचे नेते म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले गोपीचंद पडळकर यांना भाजपाने बारामतीच्या रिंगणात उतरवून ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बारामती मतदारसंघात पाचव्या फेरीनंतर ३१५४८ मतांनी आघाडी घेतली आहे. गोपीनाथ पडळीकर पडली आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३०५५७९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६८ .३८ टक्के मतदान झालंय. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी १,५०,५८८ मतं मिळवूत भाजपाच्या बाळासाहेब गावडे यांचा पराभव केला होता.