१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 02:03 PM2024-05-18T14:03:00+5:302024-05-18T14:04:50+5:30

डोक्यावर हेल्मेट घालून तसाच उभा असल्याने आणि समोरच्या टँकरची उंची जास्त असल्याने मी वाचलो गेलो

100-foot hoarding collapsed People were trapped the young man told the story of the terrible incident of Ghatkopar | १०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती

१०० फुटांचे होर्डिंग कोसळले; लोक अडकली, घाटकोपरच्या भयंकर घटनेची तरुणाने सांगितली आपबीती

आकाश बनसोडे

धायरी : मी नेहमीप्रमाणे विलेपार्लेहून दुपारी साडेतीन वाजता पवईकडे जाण्यासाठी माझ्या स्वतःच्या बुलेटवरून निघालो मात्र साधारणत: चार वाजण्याच्या दरम्यान मोठा पाऊस अन् वादळ सुरू झाले. माझ्या कंपनीने दिलेला लॅपटॉप व माझ्याकडचे लॅपटॉप अशी दोन लॅपटॉप भिजू नये म्हणून मी घाटकोपर येथे असणाऱ्या पेट्रोल पंपावर थांबलो. दरम्यान पाऊस व वादळ जास्त असल्याने मी बुलेटवरून खाली उतरलो. तिथे शेजारी उभा असणाऱ्या पेट्रोल टँकरशेजारी मीही उभा राहिलो. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ उडू लागली. तितक्यात १०० फूट लांबीचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. दोन मिनिटे तर डोळ्यासमोर अंधारी आली. नंतर पाहतो तर काही जण होर्डिंग, गाडी खाली अडकलेले होते.

मी उभा असलेला टँकरवरदेखील होर्डिंग पडल्याने टँकर अर्ध्यापर्यंत चेंबून खाली गेला. तसा मीही खाली पडलो. मात्र इतर कारवरती पडलेले फोल्डिंगमुळे त्या गाड्या गुडघ्याच्या लेव्हलला आल्या होत्या. डोक्यावर हेल्मेट घालून तसाच उभा असल्याने तसेच टँकरची उंची जास्त असल्याने मी वाचलो गेलो. मला पाठीला मुक्कामार लागला तसेच हाताला खरचटले. मात्र तशा अवस्थेतदेखील आम्ही इतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. घडलेली घटना अत्यंत भयंकर असून ही घटना आठवली.

मित्राशी फोनवर बोलत असल्याने गेलो बाजूला...

पाऊस पडतोय म्हणून आकाश पेट्रोल पंपावर थांबलो. तितक्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन आला म्हणून त्याने दुचाकीवरून उतरून टँकरच्या आडोशाला गेला. इतक्यात मोठा आवाज झाला. त्याचवेळी आकाशही ओरडला. अन् फोन कट झाला. मित्राने तो आवाज अन् त्याचे ओरडणे ऐकून त्याच्या वडिलांना फोन करून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आकाशच्या वडिलांनी मुंबईला जाऊन आकाशवर प्रथमोपचार करून त्याला पुण्यात घेऊन आले.

आयआयटी पवईमध्ये इंजिनिअरिंग करतोय

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे परिसरात मी राहतो. पवई येथील आयआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असून दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर त्याने इंटर्नशिप करण्यासाठी विलेपार्ले येथील कंपनीत जॉब करतो आहे.

                                                                                                                    (शब्दांकन : कल्याणराव आवताडे)

Web Title: 100-foot hoarding collapsed People were trapped the young man told the story of the terrible incident of Ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.