Pimpri Chinchwad: दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:55 AM2024-03-12T10:55:23+5:302024-03-12T10:56:11+5:30

पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. मोशी येथे रविवारी ...

He killed his wife by hitting her on the head with an iron rod for not paying for alcohol | Pimpri Chinchwad: दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून

Pimpri Chinchwad: दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून

पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. मोशी येथे रविवारी (दि. १०) ही घटना घडली. जयश्री मारुती बाबना (४७, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. मारुती बाबना (५०) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा बालाजी मारुती बाबना (२९) यांनी एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती याला दारूचे व्यसन आहे. त्याने रविवारी पत्नी जयश्री यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, जयश्री यांनी पती मारुती याला दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून मारुती याने जयश्री यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यात जयश्री यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: He killed his wife by hitting her on the head with an iron rod for not paying for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.