मन उडू उडू झालं....! हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 04:04 PM2022-05-21T16:04:22+5:302022-05-21T16:14:19+5:30

Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळे तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नबेडीत अडकली आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नबेडीत अडकली आहे.

दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत सात फेरे घेत हृताने नवीन आयुष्याला सुरुवात केली. नुकतेच हृताने इंस्टाग्रामवर रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत.

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या लग्नाला बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.

हृता-प्रतीकच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ह्रताने सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रतीक शाहसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन प्रतीकने केले आहे.

हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून.