कुठे हरवलाय 'इंडियन आयडॉल' विजेता अभिजीत सावंत?; सध्याची लाइफस्टाइल पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 06:00 AM2022-05-20T06:00:00+5:302022-05-20T06:00:01+5:30

Abhijit sawant: सध्या अभिजीत कलाविश्वापासून काहीसा दूर गेला आहे. त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

रिअॅलिटी शोमधील सर्वात मानाचा आणि बहुचर्चित ठरणारा शो म्हणजे इंडियन आयडॉल. २००४ मध्ये या शोची सुरुवात झाली आणि अजूनही हा शो यशस्वीपणे सुरु आहे.

इंडियन आयडॉलमुळे कलाविश्वाला अनेक गुणी गायक मिळाले आहेत. त्यातलाच एक म्हणजे अभिजीत सावंत.

या शोमुळे आणि त्याच्या आवाजामुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. सुरुवातीच्या काळात अभिजीत सातत्याने चर्चेत राहिला. मात्र, आता त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळतं.

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीतने 'आप का अभिजीत' हा त्याचा पहिला म्युझिक अल्बम लॉन्च केला. या अल्बमला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून यातील 'महोब्बते लुटाऊंगा' हे गाणं सुपरहिट झालं.

अभिजीतचा जुनून हा आणखी एक दुसरा अल्बमदेखील आहे. त्यानंतर त्याने इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील 'मरजावां' या गाण्याला त्याचा आवाज दिला.

सध्या अभिजीत कलाविश्वापासून काहीसा दूर गेला आहे. त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

कलाविश्वापासून दूर असलेला अभिजीत सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तो त्याच्या कुटुंबासोबतचे वा नव्या प्रोजेक्टविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो.

अभिजीतचं लग्न झालं असून त्याला दोन मुलीदेखील असल्याचं पाहायला मिळतं.

२०१० मध्ये अभिजीत एका अपघातामुळे चर्चेत आला होता. एका स्कुटरला धडक दिल्यामुळे नागरिकांना भररस्त्यात त्याला मारहाणकेली होती.

सध्या अभिजीत संगीत क्षेत्रातच त्याचं नाव आजमावत असून तो अनेक स्टेज शो करतो.

अभिजीतने कलाविश्वात पुन्हा त्याचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेसं यश आलं नाही. त्यामुळे तो स्टेज शोच्या माध्यमातून त्याचं घर चालवत आहे.