PHOTOS : 'निसर्गरम्य' मतदान केंद्र! संस्कृती अन् ऐतिहासिक वारसा; मध्य प्रदेशात अनोखा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 06:29 PM2023-11-16T18:29:47+5:302023-11-16T18:32:00+5:30

MP Election 2023 : मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवस विविध पक्षांचे नेते राज्यभर फिरत होते.

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवस विविध पक्षांचे नेते राज्यभर फिरत होते.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रांवर अनोख्या पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. इंदूरमध्ये स्मार्ट, पिंक, विशिष्ट थीमवर मॉडेल मतदान केंद्र बांधण्यात आले, ज्याचे फोटो अनेकांचे लक्ष वेधत आहेत.

आदर्श मतदान केंद्रात पर्यावरणाशी निगडीत थीमवर बांधलेल्या मतदान केंद्रावर मतदारांना हिरव्यागार निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.

घरातील वापरात नसलेल्या वस्तूंपासून आकर्षक सजावट कशी करता येईल यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

आदर्श मतदान केंद्र 3R च्या थीमवर निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

काही ठिकाणी ऐतिहासिक वारसा दाखवण्यात आला, तर काही ठिकाणी हिरवळ-जंगल, युवा, कला आणि संस्कृतीचे दर्शन होत आहे.

आदर्श मतदान केंद्र वेगवेगळ्या थीमवर आधारित बांधण्यात आले आहे, ज्यामध्ये इंदूर शहराच्या इतिहासासोबतच, इंदूरच्या संस्कृतीला अनुसरून मतदान केंद्र बांधण्यात आले.

१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येणार आहे.

मतदानाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असून, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.