बागेश्वर बाबा बनले फलंदाज, भगव्या कफनीमध्ये मैदानात उतरून ठोकले चौकार-षटकार, फटकेबाजीपुढे सूर्याही फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:41 PM2023-05-24T13:41:38+5:302023-05-24T16:39:04+5:30

Bageshwar Dham: छतरपूर येथील बागेश्वर धाम येथील पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे विविध कारणांमुळे चर्चेच असतात. आता पुन्हा एकदा बागेश्वर बाबा चर्चेत आले आहेत. मात्र त्यासाठी कुठला चमत्कार किंवा वादविवाद नाही तर क्रिकेट आहे.

छतरपूर येथील बागेश्वर धाम येथील पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे विविध कारणांमुळे चर्चेच असतात. आता पुन्हा एकदा बागेश्वर बाबा चर्चेत आले आहेत. मात्र त्यासाठी कुठला चमत्कार किंवा वादविवाद नाही तर क्रिकेट आहे.

भारतात क्रिकेटला धर्माप्रमाणे मानले जाते. त्यामुळे या खेळाची भुरळ भल्याभल्यांना पडते. अध्यात्मिक गुरू, बाबा यांनाही क्रिकेटची भूरळ पडली नसती तर नवल. आतातर चक्क बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचंही असंच एक रूप पाहायला मिळालं.

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे जैसीनगर येथे सध्या कथा प्रवचन सांगत आहेत. दरम्यान, त्यांचं एक वेगळंच रूप भक्तांना पाहायला मिळालं. बागेश्वर धाम सरकार सकाळीच बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसले. तर आयोजक आणि त्यांचे भक्त गोलंदांजी करत होते. या दरम्यान, बागेश्वर महाराजांनी तुफान फटकेबाजी केली.

मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड परिसरातील सागर जिल्ह्यातील जैसीनगर येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमंत कथेचं पारायण सुरू आहे. यादरम्यान, सोमवारी सकाळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बॅट घेऊन संत निवासाजवळ आले. तिथे त्यांनी सुमारे ५० मिनिटे फलंदाजी केली. त्या दरम्यान त्यांनी तब्बल १६ चौकार आणि १९ षटकार ठोकले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले की, कथा आणि प्रश्नोत्तरादरम्यान व्यस्ततेमुळे ते ३ ते ५ तासांपर्यंतच झोप घेतात. आपल्याला भक्तांच्या गोतावळ्यात असतात. दरम्यान, फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योग करणं आवश्यक आहे. तसेच व्यायामादरम्यान, व्यक्तीच्या शरीरातून घाम येणंही आवश्यक आहे. क्रिकेट हा सुद्धा एक खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून आपली आवड जोपासण्याबरोबरच ते व्यायामही करून घेतात.

दरम्यान, भक्तांना बागेश्वर धाम महाराजांचा हा अंदाज खूप आवडला आहे. भक्तांनीही धीरेंद्र शात्री यांच्या फलंदाजीचा आनंद घेतला.