निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
( रमेश कदम ) हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे चहाची टपरी चालवणारा गजाजन कोरडे दररोज माकडांना बिस्किटांचा खाऊ देतो. दररोज चोवीस पुडे घेऊन जात तो स्वतःच्या हाताने माकडांना बिस्किटे खाऊ घालतो. ही माकडेही त्याच्या परिचयाची झाली आहेत. दररोज त्याची वाट पाहतात. चहावाल्याची माकडांप्रतीची ही आपुलकी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. ( व्हिडिओ - https://fb.watch/7m8rlpfaGT/ )