World Liver Day : लिव्हरला इन्फेक्शन झालं हे कसं ओळखाल? जाणून घ्या बचावाचे उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:10 AM2024-04-19T09:10:13+5:302024-04-19T09:45:06+5:30

World Liver Day : जर लिव्हरला इन्फेक्शन झालं तर शरीर काय संकेत देतं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच उपचार घेता येतील.

World Liver Day : जगभरात 19 एप्रिल रोजी वर्ल्ड लिव्हर डे पाळला जातो. लिव्हरसंबंधी आजारांबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. सध्या जगभरात लिव्हरच्या अनेक समस्यांचे लोक शिकार होत आहेत आणि यामुळे मृत्यूंची संख्याही वाढली आहे. अशात लिव्हरच्या आजारांबाबत, त्यांच्या संकेतांबाबत लोकांना माहीत असलं पाहिजे. या उद्देशाने जर लिव्हरला इन्फेक्शन झालं तर शरीर काय संकेत देतं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच उपचार घेता येतील. लिव्हर इन्फेक्शनच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला लिव्हर फेलिअरचा धोकाही राहतो.

पोटात सूज आणि वेदना - लिव्हर इन्फेक्शन झाल्यावर सुरूवातीला तुमच्या पोटात सतत दुखतं आणि सूजही येते. त्यामुळे याकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करून नका. समस्या जास्त राहत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार घ्या.

त्वचेवर खाज - लिव्हर इन्फेक्शनच्या समस्येत त्वचेवर खाज आणि रॅशेज सर्वात कॉमन आहे. त्वचेवर रॅशेज आणि खाज वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतात. पण जर तुम्हाला पुन्हा पुन्हा ही समस्या होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये.

लघवीचा रंग बदलणे - लघवीचा रंग बदलणे हाही लिव्हर खराब होण्याचा संकेत मानला जातो. काविळीच्या समस्येतही तुम्हाला हे लक्षण दिसू शकतं. लघवीच्या रंगात बदल झाल्यावर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

काविळ - काविळ लिव्हरसंबंधी एक गंभीर समस्या आहे. शरीरात असलेलं केमिकल बिलीरूबिनचं प्रमाण वाढलं की, तुम्हाला काविळीची समस्या होऊ शकते. लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं तर तुम्हाला काविळीची समस्या पुन्हा पुन्हा होते.

उलटी आणि मळमळ - उलटी आणि मळमळ होण्याची समस्या तुम्हाला पुन्हा पुन्हा होत असेल. अनेक उपचार घेऊनही ही समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावं याचे काही उपाय खालीलप्रमाणे सांगता येतील.

भूक कमी लागणे - भूक कमी लागणे यालाही लिव्हर इन्फेक्शन किंवा लिव्हर खराब झाल्याचा संकेत मानलं जातं. लिव्हरचा एक भाग शरीरात जाणारं अन्न पचवण्यात मदत करतं. ज्यामुळे लिव्हर इन्फेक्शन झाल्यावर तुम्हाला भूक कमी लागते आणि जेवण करण्याची इच्छा होत नाही.

आहारात फायबरचा समावेश - आहारात जास्तीत जास्त प्रमाणात फायबर किंवा रेशोचा समावेश करा. त्यासोबतच कॅल्शिअमचं भरपूर प्रमाण असणाऱ्या खाद्य पदार्थांचंही सेवन करा. यासाठी वेगवेगळी फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

व्यायाम - शरीर सुस्त पडून राहिल्याने वेगवेगळ्या रोगांचा धोका वाढतो आणि त्यामुळे पचनक्रियाही सुस्त होते. सोबतच पोटही साफ होत नाही. यामुळे बाइल ज्यूस गॉल बाहेर निघत नाही आणि याने लिव्हर प्रभावित होतं.

भरपूर पाणी प्या - कोणताही आजार झाला की, त्यात खासकरून गॅस्ट्रोनॉमिकल अवयव सामिल असतात, त्यापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे पाणी आहे. भरपूर पाणी प्या आणि हे अवयव निरोगी ठेवतं.

लसूण - लिव्हर साफ करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. याने लिव्हरमधील एंजाइम्सला अॅक्टिव्हेट करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच यात एलिसिन आणि सेलेनियम नावाचे दोन नैसर्गिक कपांऊड आढळतात, जे लिव्हर-क्लीनिंग प्रोसेस आणखी चांगली करतात.

लिव्हर डिटॉक्स करतं पपनस - पपनस हे एक लिंबू वर्गीय फळ आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात. पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. सोबतच यात ग्लूटेथिओन नावाचं प्रभावी अॅंटीऑक्डेंसिट आढळतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करतं.

रक्त शुद्ध करतं बीट - बीट हे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि याच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. यात भरपूर प्रमाणात प्लांट फ्लावनॉयड्स आणि बीटा-कॅरोटीन आढळतात जे लिव्हरची क्रिया ठिक करतं. सोबतच बीट हे रक्त शुद्ध करण्यासाठीही फायदशीर फळ आहे. त्यामुळे रोज जेवण करताना या आहारात समावेश करावा.