साधेपणा जपणारे पर्रीकर; नम्र नेत्याच्या आठवणींना फोटोंमधून उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:54 PM2019-03-18T13:54:23+5:302019-03-18T13:58:17+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं काल निधन झालं. अतिशय नम्र आणि प्रामाणिक नेते असलेल्या पर्रीकरांनी कायम साधेपणा जपला. फेब्रुवारी 2018 पासून ते कर्करोगाशी दोन हात करत होते.

पर्रीकर त्यांच्या साधेपणामुळे अतिशय लोकप्रिय होते. अनेकदा ते मोटारसायकलवरुन फिरायचे. सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घ्यायचे.

2014 मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता आली. यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना दिल्लीत बोलावून संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली. यानंतर ते अनेकदा जवानांच्या भेटीगाठी घ्यायचे.

पर्रीकर यांच्या साधेपणाची कायम चर्चा व्हायची. त्यांनी कधीही आपल्या पदाचा बडेजाव केला नाही. एखाद्या लग्नात ते सर्वसामान्यांसारखेच आहेर देण्यासाठी रांगेत उभे राहायचे.

पर्रीकरांना सायकल चालवायला आवडायचं. मोकळ्या वेळेत ते सायकल चालवायचे. हवाई चप्पल आणि हाफ शर्ट त्यांची ओळख होती.

पर्रीकरांचा साधेपणा कायम सर्वसामान्यांना भावला. घरातून स्कूटरवरुन निघणारे, रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर जेवणारे पर्रीकर गोवेकरांच्या कायम स्मरणात राहतील.

मनोहर पर्रीकर लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यामुळे पर्रीकरांना पाहायला छोट्यांची गर्दी व्हायची.

पर्रीकरांना फुटबॉल खेळायला आवडायचं. व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाल्यावर ते फुटबॉल ग्राऊंडवर जायचे.

मनोहर पर्रीकर कायम इकॉनॉमी क्लासनं प्रवास करायचे. जनरल डब्यातून प्रवास करताना त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही.