Shubhangi Atre: टीव्हीवरील साध्याभोळ्या वहिनीने साडीमध्ये दाखवला हॉट अवतार, तिच्या अदांवर फॅन्स फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:55 PM2022-07-28T17:55:23+5:302022-07-28T17:57:58+5:30

Shubhangi Atre Photos: टीव्हीवरील हिट शो भाभीजी घर पर है २०१५ मध्ये सुरू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या शो ने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. या शोमधील अंगूरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

टीव्हीवरील हिट शो भाभीजी घर पर है २०१५ मध्ये सुरू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या शो ने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. या शोमधील अंगूरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

अभिनेत्री शुभांगी अत्रे ही भाभीजी घर पर है कार्यक्रमासोबत अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे. तिचं पात्र लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मालिकेमध्ये आपल्या साध्या भोळ्या अंगूरी भाभीच्या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणारी शुभांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते.

हल्लीच शुभांगी हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोक कुणाचंही मन मोहून घेतील, असे आहेत. शुभांगी साडी नेसून तिच्या बोल्ड अदांनी लोकांना घायाळ करत आहे.

बहुतांश वेळा साध्या आणि देशी लुकमध्ये दिसणाऱ्या शुभांगी अत्रे हिने यावेळी आपल्या हॉट अंदाजाने फॅन्सना चकीत केले आहे. तिने साडीच नेसली आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर अशा काही पोझ दिल्या आहेत की, त्या पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

ताजा फोटोंमध्ये अंगूरी भाभी उर्फ शुभांगी अत्रेने साधी साडी नेसली आहे. लो वेस्ट साडीला तिने स्लीवलेस ब्लाऊजसोबत सुंदर पद्धतीने कॅरी केले आहे.

आता इंटरनेटवर शुभांगी अत्रेचे हे नवे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. शुभांगी अत्रे हिने २०१७ मध्ये भाभीजी घर पर है कार्यक्रमात शिल्पा शिंदे हिला रिप्लेस केले होते. तेव्हापासून ती सातत्याने अंगूरी भाभीच्या भूमिकेत दिसत आहे.