Rohit Sharma Mumbai Indians Playing XI : "तू स्वत:लाच संघातून बाहेर का नाही ठेवलंस?"; कॉमेंटेटरच्या प्रश्नावर रोहित शर्माचं रोखठोक उत्तर

रोहितने दिलेलं 'स्मार्ट' उत्तर एकदा ऐकाच...

Rohit Sharma Mumbai Indians Playing XI : IPL 2022 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आमने सामने आले.

हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १९३ धावा कुटल्या. या डावात राहुल त्रिपाठीने ७६ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

समालोचकाने रोहित शर्माला सामना सुरू होण्यापूर्वी टॉसच्या वेळी विचारले की तू स्वतःला प्लेइंग ११ मधून का बाहेर काढले नाही? त्यावर रोहितने झक्कास उत्तर दिले.

नाणेफेकीच्या वेळी समालोचक इयन बिशपने विचारले की मुंबई इंडियन्स आता प्लेऑफमध्ये जाऊ शकत नाहीत, मग कामाचा ताण लक्षात घेऊन तू स्वतःला (रोहित शर्मा) आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती का दिली नाही?

यावर रोहित शर्माने अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. "संघातील कोअर गटातील मुख्य खेळाडू हे कायम खेळत असतात. त्यांचे संघात असणे खूप महत्त्वाचे असते."

"एक संघ म्हणून आपल्याला काही गोष्टींचा कायम विचार करावा लागतो. सर्व खेळाडूंना घेऊन पुढे जायचे असते. त्यामुळे आम्ही काही खेळाडूंना विश्रांती दिली, पण महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देणं शक्य नसतं", असे रोहितने स्पष्टीकरण दिले.