CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos

CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024मध्ये कॅमेरा लेन्समधून टिपलेल्या सौंदर्यवतींचा बोलबाला असतो. त्यातील एका तरुणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल...

CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मधील CSK vs PBKS सामन्यात कॅमेरामनने स्टेडियममधील काही सौंदर्यवतींची झलक टिपली.

कॅमेरामनने कॅमेरा लेन्समधून टिपलेल्या या सौंदर्यवतींमधील एका तरुणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल...

ही तरुणी म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री व मॉडेल अन्वैशी जैन. ती मूळची मध्य प्रदेशातील खजुराहोची असून तिची जन्मतारीख २५ जून आहे.

अन्वेशीचे शालेय शिक्षण खजुराहोमध्येच झाले. पुढे तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पण व्यवसाय करण्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठली.

अन्वेशी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला 'बॉडी शेमिंग'चा सामना करावा लागला, ज्यामुळे तिला स्वतःचाच राग यायचा.

'गंदी बात' या वेब सीरिजमुळे ती लोकप्रिय झाली. या सिरिजमध्ये तिच्या हॉटनेसची चर्चा झाली. त्यात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले.

त्यानंतर अन्वेशीची लोकप्रियता वाढत गेली. आज अन्वेशी तिच्या बोल्ड स्टाइल आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते.

ट्रोलिंगचा सामना करत आज अन्वेशीने टीकेच्या पलिकडे जाऊन लाखो लोकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

अन्वेशीची अल्पावधीतच लोकप्रियता वाढली. याचा अंदाज सोशल मीडियावरून सहज लावता येऊ शकतो. आज तिचे इन्स्टाग्रामवर ६.२० मिलियन फॉलोअर्स आहेत.

अन्वेशीने अनेक मोठे शो होस्ट केले आहेत. याशिवाय आतापर्यंत तिने ९ वेब सिरिजमध्ये अभिनय केला आहे. तसेच काही म्युजिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य- अन्वेशी जैन Anveshi Jain Instagram)