Share Market Updates: TATA च्या या शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई, २ वर्षांत गुंतवणूकदारांना ७०० टक्के रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:52 PM2022-05-19T14:52:14+5:302022-05-19T14:57:06+5:30

Share Market Live Updates: टाटा समुहाच्या एका शेअरनं गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. त्यांना दोन वर्षांत या शेअरनं जबरदस्त नफा मिळवून दिलाय.

Share Market Live Updates: कोरोना महासाथीमुळे भारतीय शेअर बाजारात विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येताच शेअर बाजारही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे.

या काळात अनेक शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा दिला आहे. टाटा पॉवर त्यापैकीच एक आहे. कोरोनानंतर टाटा पॉवरच्या शेअरची किंमत 30 रुपयांवरून 237.50 रुपयांपर्यंत गेली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला असला तरी या शेअनं चांगले रिटर्न दिले आहेत.

6 एप्रिल 2022 रोजी टाटा पॉवरच्या शेअरनं 52 आठवड्याचा उच्चांक गाठला होता. तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत 298.05 रुपये प्रति शेअर होती. म्हणजेच गेल्या दीड महिन्यात हा स्टॉत 20 टक्क्यांनी खाली आला आहे.

या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 6.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या स्टॉकमधून फक्त 4.50 टक्के रिटर्न मिळाले आहेत.

जर वर्षभरापूर्वीची स्थिती पाहिली तर या शेअरची किंमत 104 रुपयांवरून 237.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत 130 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

NSE वर 3 एप्रिल 2020 रोजी टाटा पॉवरच्या शेअरची किंमत 30 रुपये होती. मात्र दोन वर्षांनंतर कंपनीच्या शेअरची किंमत 237.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात टाटा पॉवरच्या शेअरच्या किमतीत 700 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला या कंपनीच्या शेअरनं मालामाल केलं आहे.