Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 50 रुपयांच्या बचतीत 35 लाखांचा फायदा; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:09 PM2022-05-23T22:09:10+5:302022-05-23T22:12:54+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळवून देतात.

Post Office Scheme: आज केलेली गुंतवणूक उज्वल भविष्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी अतिशय सुरक्षित ठरेल.

पोस्ट ऑफीसच्या अनेक योजना शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळवून देतात. तुम्हीही अशाच प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. यामध्ये कमी रिस्क आणि जास्त रिटर्न मिळतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुरक्षा योजने'बद्दल सांगणार आहोत.

या योजनेत तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. यात तुम्हाला दरमहा फक्त 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला भविष्यात 30 ते 35 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते. या प्लॅनचे प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकतात.

विशेष म्हणजे या योजनेवर तुम्ही कर्जदेखील घेऊ शकता. ही योजना घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्षांनी सरेंडर करण्याचा पर्याय आहे. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळत नाही.

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.

अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांत 31.60 लाख रुपये, 58 वर्षांत 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळतो.