PHOTOS : कतई कहर...! जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:30 PM2024-05-06T20:30:45+5:302024-05-06T20:35:13+5:30

Janhvi Kapoor Bold Photos : जान्हवी कपूरचं मनमोहक सौंदर्य चाहत्यांना आकर्षित करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. जान्हवी कपूरचे मनमोहक सौंदर्य चाहत्यांना आकर्षित करत असते. आता तिने काही ग्लॅमरस फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले.

अभिनेत्री जान्हवी तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.

जान्हवीने आता काही हॉट पोझ देत फोटो पोस्ट केले आहेत. यामधील तिचा मेकअप लूक चाहत्यांना भुरळ घालणारा आहे.

जान्हवी कपूर रिलेशनशिपमध्ये आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) ती डेट करत आहे.

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, ती लवकरच आगामी ज्युनिअर एनटीआर, 'देवरा', रामचरण तेजाच्या RC16 या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणार आहे.

तर वरुन धवनसोबत ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमात झळकणार आहे.

जान्हवीचे हे फोटो पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. बिकिनीपासून साडीपर्यंत प्रत्येक लूकमधील तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर हिने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

सर्व फोटो- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram)