खारघरमधील चतुर्भुज इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

By वैभव गायकर | Published: May 14, 2024 07:41 PM2024-05-14T19:41:38+5:302024-05-14T19:43:47+5:30

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Quadrangular building fire in Kharghar Fortunately there were no casualties | खारघरमधील चतुर्भुज इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

खारघरमधील चतुर्भुज इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

पनवेल : खारघर शहरातील सेक्टर 21 मधील चतुर्भुज इमारतीला दि.14 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. 12 व्या मजल्याला ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच खारघर शहरातील सिडकोच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित घराचे मोठे नुकसान झाले आहे.

घरातील फर्निचर,इलेक्ट्रिक उपकरणे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.आगीच्या घटनेने चतुर्भुज ईमारतीत मधील अनेक रहिवाशांनी आपल्या घरातून खाली धाव घेतली. यावेळी रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण होते. सायंकाळी उशिरा पर्यंत अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले. घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Web Title: Quadrangular building fire in Kharghar Fortunately there were no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.