ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

By योगेश पिंगळे | Published: May 9, 2024 07:04 PM2024-05-09T19:04:23+5:302024-05-09T19:06:40+5:30

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे.

lok sabha elections 2024 Voting campaign through green mascots | ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन 20 मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत.

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर वोटर हेल्पलाईन ॲपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे. हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रदर्शित करीत आहेत. 

महापालिका निवडणुक विभागाचे उप आयुक्त शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त  तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे. पथनाटयांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळत आहे.

Web Title: lok sabha elections 2024 Voting campaign through green mascots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.