‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

By राकेशजोशी | Published: April 19, 2024 05:37 AM2024-04-19T05:37:31+5:302024-04-19T05:37:46+5:30

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे.

When the war is with one's own people, it is better to lose Post of Former Deputy Chief Minister of Haryana | ‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

राकेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड
: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली असताना या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला रणांगणात दिसत नसल्याने ते राजकीय अज्ञातवासात आहेत की, पडद्यामागचे सूत्रधार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

इंडियन नॅशनल लोकदलपासून वेगळे होऊन स्थापन झालेला दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष राज्यातील सत्तेतून पायउतार होताच विस्कळीत झाला. पक्षाचे एकेक नेते पक्ष सोडत आहेत. हरयाणात भाजपसोबतची युती तोडल्यानंतर जेजेपीला ग्रहण लागल्याचे दिसत असताना दुष्यंत चौटालाही राजकारणातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

आयएनएलडीपासून फारकत घेऊन जेजेपीची स्थापना झाली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीने १० जागा जिंकत भाजपसोबत सरकार चालवले. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले. भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर जेजेपी पक्ष अक्षरश: मोडकळीस आला. त्यामुळे दुष्यंत चौटाला यांचे राजकीय अस्तित्व संपले का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मातोश्रींना मागावी लागली माफी

  • अल्पवयात राजकारणात आलेल्या दुष्यंत चौटाला यांना पक्षापासून रस्त्यापर्यंत संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत असताना, नसताना ते टीकेचे धनी बनले. विशेषत: शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
  • आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड असल्याने त्यांना गाडीतून उतरावे लागले. अखेर त्यांच्या मातोश्री नैना चौटाला यांनी आंदोलनकर्त्यांची माफी मागावी लागली.
  • सत्तेत असताना स्थानिक युवकांना शासकीय नोकरीत आरक्षण दिल्याचे वचन त्यांनी पाळले नसल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. महिला कॉन्स्टेबल भरतीवेळीही त्यांच्यावर टीका झाली.

म्हणूनच हताश दुष्यंत म्हणतात...
- जेजेपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. 
- अनेक नेते अन्य पक्षांत प्रवेश करत असल्याने निराश चौटाला यांना त्यांच्या एक्स हँडलवर लिहावे लागले की, जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा ते हरणेच चांगले.

Web Title: When the war is with one's own people, it is better to lose Post of Former Deputy Chief Minister of Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.