‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:58 PM2024-05-16T15:58:55+5:302024-05-16T16:00:02+5:30

Lok Sabha Election 2024: देशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही. विरोधी पक्षांनी हिंदू-मुसलमान करत आपली व्होटबँक तयार केली आहे. आता मोदीने यांचा बुरखा फाडला आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: 'CAA is Modi's guarantee, no one will be able to remove it', Modi challenged from Azamgarh | ‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सीएएच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य केलं आहे. आझमगड येथील प्रचारसभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही. विरोधी पक्षांनी हिंदू-मुसलमान करत आपली व्होटबँक तयार केली आहे. आता मोदीने यांचा बुरखा फाडला आहे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

मोदी म्हणाले की, तुमच्याकडे जेवढी असेल तेवढी ताकद लावा. पण तुम्ही सीएए हटवू शकणार नाही. विरोधी पक्षांचा बुरखा फाटला आहे. गांधीजींचं नाव घेऊन जे लोक सत्तेचं सोपान चढले. त्यांनीच गांधीचींचा विश्वास तोडला आहे. मोदीच्या गॅरंटीच्या अर्थ काय होत असेल याचं ताजं उदाहरण म्हणजे सीएए कायदा होय. कालच सीएए कायद्यांतर्गत आश्रितांना भारताचं नागरिकत्व देण्याचं काम सुरू झालं आहे. हे लोक धर्माच्या आधारावर भारताच्या झालेल्या फाळणीची शिकार झाले होते.

नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने भारतात आश्रयाला आलेल्या लोकांची कधीही दखल घेतली नाही. कारण हे लोक त्यांची व्होट बँक नव्हते. यामधील बहुतांश ओबीसी आणि मागास-दलित बांधव आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. काँग्रेसनेही तेच काम केलं. सपा-काँग्रेस, इंडिया आघाडी यांनी त्यांच्यासोबत कुठलही चांगलं काम केलेलं नाही. तर त्यांनी या लोकांनी असं खोटं पसरवलं की त्यामुळे देशामध्ये दंगली झाल्या. आजही मोदींचा सीएए हा त्यांच्यासोबतच जाईल, असा दावा इंडिया आघाडीचे लोक करत असतात.

काश्मीरच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, आधी हे लोक काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे. मात्र आता ते व्होट बँकेचं राजकारण करू शकणार नाहीत. आम्ही ३७० ची भिंत पाडली आहे. असा उल्लेखही नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच आज जग हे जनसमर्थन पाहत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम जगाला आश्चर्यचकीत करत आहे. भारतातील लोकांना मोदींच्या गॅरंटीवर किती विश्वास आहे, हे जग पाहत आ, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.  

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: 'CAA is Modi's guarantee, no one will be able to remove it', Modi challenged from Azamgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.