UP Election Result: काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:38 PM2022-03-14T12:38:11+5:302022-03-14T12:38:35+5:30

Uttar Pradesh Election Result: भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये २५५ जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर भाजपा आघाडीने २७३ जागांवर बहुमत मिळवत सत्ता राखली आहे.

Uttar Pradesh Election Result: BJP candidates lose deposits in UP; Yogi, three lost yogi adityanath, Narandra Modi's wave | UP Election Result: काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले'

UP Election Result: काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले'

Next

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाची लाट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. योगी, मोदींच्या वादळात सपाचे स्वप्न भंगले आणि योगींनी पुन्हा एकदा विरोधात वातावरण असूनही बहुमतापेक्षा कितीतरी अधिक जागा निवडून आणल्या. असे असले तरी याच युपीत भाजपाच्या तीन उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले आहे. विश्वास बसत नाहीय ना, पण हे याच विधानसभा निवडणुकीत घडले आहे. 

भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये २५५ जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर भाजपा आघाडीने २७३ जागांवर बहुमत मिळवत सत्ता राखली आहे. मित्र पक्ष अपना दल (एस) 12 आणि निषाद पार्टीने सहा जागांवर विजय मिळविला आहे. भाजपाच्या या लाटेत युपीतीलच तीन अशा जागा होत्या जिथे भाजपाचे उमेदवार त्यांचे अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. २०१७ मध्येही पाच भाजपा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 

प्रतापगढ़ जिल्ह्यातील कुंडामध्ये जनसत्ता पार्टीचे उमेदवार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भय्या आमदार झाले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे सिंधुजा मिश्रा सेनानी होते, परंतू सपा आणि राजा भय्या यांच्यात थेट निवडणूक झाल्याने सेनानी बाहेर टाकले गेले. राजा यांना 99612 मते तर सेनानी यांना 16455 मते मिळाली. 

बलिया जिल्ह्यातील रसडामध्ये बसपा उमेदवार उमाशंकर सिंह आमदार झाले आहेत. भाजपाचे उमेदवार बब्बन यांना 24,235 मते मिळाली. त्यांना 12.08 टक्के मते मिळाली. यामुळे डिपॉझिट जप्त झाले. 

जौनपुर जिल्ह्यातील मल्हनी विधानसभा मतदारसंघात भाजपाला डिपॉझिट गमवावे लागले. भाजपाचे उमेदवार कृष्ण प्रताप सिंह केपी यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. सपाचे लकी यादव हे विजयी झाले. त्यांना 97357 मते मिळाली. तर कृष्ण प्रताप सिंह केपी यांना 18319 (8.01 टक्के) मते मिळाली. सिंह यांना डिपॉझिट वाचविता आले नाही. 

Web Title: Uttar Pradesh Election Result: BJP candidates lose deposits in UP; Yogi, three lost yogi adityanath, Narandra Modi's wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.