Video - घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहणाऱ्या मुलाची UPSC मध्ये नेत्रदिपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:51 PM2024-04-17T12:51:49+5:302024-04-17T12:56:05+5:30

छोट्याशा झोप़डीत राहणाऱ्या पवनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

upsc cse results 2023 pawan kumar from bulandshahr cleared upsc lives in hut visuals surfaced | Video - घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहणाऱ्या मुलाची UPSC मध्ये नेत्रदिपक भरारी

Video - घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहणाऱ्या मुलाची UPSC मध्ये नेत्रदिपक भरारी

UPSC CSE परीक्षेचा निकाल मंगळवारी (16 एप्रिल) जाहीर झाला. यावेळी आदित्य श्रीवास्तव याने अव्वल स्थान पटकावले आहे. अनिमेष प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या सायना भागातील रघुनाथपूर या गावातील रहिवासी असलेल्या पवनला यूपीएससीमध्ये 239 वा रँक मिळाला आहे. छोट्याशा झोप़डीत राहणाऱ्या पवनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

UPSC मध्ये 239 वा रँक मिळवणाऱ्या पवन कुमारला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. पवनच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लोकही त्याचं अभिनंदन करण्यासाठी येत आहे. पवन कुमार दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करत होता. त्याच्या घराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

पवन कुमारच्या वडिलांचे नाव मुकेश असून ते शेतकरी आहेत. पवनची आई सुमन देवी गृहिणी आहे. पवनला तीन बहिणी आहेत. पवनने 2017 मध्ये नवोदय स्कूलमधून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती. इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अलाहाबाद येथून बी.ए. त्यानंतर पवन कुमार यांनी दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 

2 वर्षांच्या कोचिंगनंतर, पवनने स्वतःच अभ्यास केला, बहुतेक वेळ त्याच्या खोलीत राहून तो अभ्यास करायचा. पवन कुमारने तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलं. त्याच्या यशाने कुटुंबीय खूप खूश झाले आहेत. सर्वजण लेकाच्या यशामुळे त्यांचं अभिनंदन करत आहे. पवनपासून अनेकांना आता प्रेरणा मिळाली आहे. 
 

Web Title: upsc cse results 2023 pawan kumar from bulandshahr cleared upsc lives in hut visuals surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.