“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 05:45 PM2023-08-06T17:45:40+5:302023-08-06T17:46:06+5:30

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी कोर्टात साक्ष नोंदवली जात आहे.

shraddha walkar murder case father vikas walkar testified before a delhi court | “आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला”

“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला”

googlenewsNext

Shraddha Walkar Murder Case: अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली जात आहे. यामध्ये श्रद्धा वालकर हीचे वडील विकास मदन वालकर यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी श्रद्धाच्या वडिलांनी साक्षीत अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. 

श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताब पुनावाला (Aftab Punawala) याच्यावर आता आरोप निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धाची हत्या करुन पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आफताबवर ठेवण्यात आला आहे. श्रद्धाच्या वडिलांनी खुलासा केला की, आफताबने छतरपूर परिसरातील १०० फूट रोडवरील स्मशानभूमी मंदिराजवळ ज्या ठिकाणी श्रद्धाला मृतदेहाचे तुकडे फेकले होते, त्याच ठिकाणी आफताबने नेले. नंतर दिल्ली पोलिसांना त्या ठिकाणी श्रद्धाच्या हाडांसह सुमारे १३ तुकडे सापडले होते. 

टॉयलेटमध्ये मृतदेहाचे तुकडे केल्याचे सांगितले

अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराना कक्कर यांच्यासमोर ही साक्ष नोंदवण्यात आली. आफताब पूनावालाने १८ मे २०२२ रोजी आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने शरीराचे छोटे तुकडे केले. आफताबने पोलीस पथकाला श्रद्धाची हत्या केलेले ठिकाण सांगितले. तसेच टॉयलेटमध्ये मृतदेहाचे तुकडे केल्याचे सांगितले, अशी साक्ष श्रद्धाच्या वडिलांनी नोंदवली. 

दरम्यान, यानंतर आफताबने कबुली दिली की त्याने शरीराचे तुकडे केलेले अवयव कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये पॅक केले होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवले होते. दुसरीकडे, आम्हाला वाटते आरोपीला फाशी द्यावी. मी न्यायालयाला विनंती करणार की लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सुनावणी सुरू व्हायच्या आधी केली होती. श्रद्धा वालकर हत्याकांडाची सुनावणी ०१ जूनपासून सुरू आहे.

 

Web Title: shraddha walkar murder case father vikas walkar testified before a delhi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.