भयंकर! चिमुकलीच्या तोंडात घुसला स्टीलचा डबा; डॉक्टरही हैराण, 7 तासांनी 'असं' दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:54 PM2022-05-22T17:54:16+5:302022-05-22T17:56:53+5:30

मुलीच्या डोक्यात आणि जबड्यात डबा अडकल्याचं दिसून आलं. टिफिनमध्ये साबणाची वडी असल्याने मुलाला श्वास घेण्यासही त्रास होत होता.

rohtak haryana pgi doctors operated 3 year old girl successfully she injured after incident at home | भयंकर! चिमुकलीच्या तोंडात घुसला स्टीलचा डबा; डॉक्टरही हैराण, 7 तासांनी 'असं' दिलं जीवदान

फोटो - news18 hindi

Next

नवी दिल्ली - हरियाणाच्या पीजीआय आणि डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करून अपघातग्रस्त झालेल्या 3 वर्षीय मुलीला जीवदान दिलं आहे. जिंद जिल्ह्य़ातील जुलाना येथील इशिका ही 3 वर्षांची मुलगी अचानक तिच्या घरातील स्टीलच्या डब्यावर पडली. हा डबा इतका धारदार होता की, तो मुलीच्या चेहऱ्यात घुसला. कुटुंबीयांनी तिला जुलाना येथील रुग्णालयात नेलं. परंतु, मुलीची स्थिती पाहता तिला रोहतक पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं. मुलगी पीजीआयमध्ये येताच तिची अवस्था पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की, मुलीच्या तोंडात स्टीलचं भांडं खोलवर गेल्यानंतरही मुलगी श्वास घेत आहे. मात्र, डब्यामुळे तिचं नाक व तोंड पूर्णपणे झाकलं गेलं होतं.

गुंतागुंतीच्या ऑपरेशनबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीची तपासणी केली असता, मुलीच्या डोक्यात आणि जबड्यात डबा अडकल्याचं दिसून आलं. टिफिनमध्ये साबणाची वडी असल्याने मुलाला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मुलीचे तातडीने सिटी स्कॅन करण्यात आलं, ज्यामध्ये टिफिनचा मोठा भाग कपाळ आणि जबड्यात अडकल्याचं आढळून आलं. जर डबा ड्रिलने कापला असता, तर त्याच्या कंपनांमुळे मुलीच्या मेंदूला गंभीर इजा होऊन मृत्यूही ओढवू शकला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

मेटल बार आणि मेटल डिस्कच्या सहाय्याने अशा परिस्थितीत टिफनचे दोन भाग करण्याचं ठरवलं, जेणेकरून कटिंगमुळे होणाऱ्या कंपनांनी मेंदूच्या भागाला इजा होऊ नये. यानंतर, डबा मधून कापून दोन भाग करण्यात आले. जबड्याच्या बाजूला अडकलेला डब्याचा भाग आधी मधोमध कापून काढण्यात आला. त्यानंतर त्यात अडकलेली साबणाची वडी काढण्यात आली. यानंतर मुलीला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्या कपाळात अडकलेला डब्याचा भाग बाहेर काढण्यात आला.

सलग 7 तास चाललेलं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं असून सध्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मुलीला सध्या न्यूरो सर्जरी विभागाच्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन मुली असून मोठ्या मुलीला ही दुखापत झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: rohtak haryana pgi doctors operated 3 year old girl successfully she injured after incident at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.