रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:54 PM2024-05-03T20:54:33+5:302024-05-03T20:57:01+5:30

....याशिवाय, त्याच्या आईने त्याच्यासाठी बनावट अनुसूचित जाती (एससी) प्रमाणपत्राची व्यवस्था करणे, हेदेखील त्याच्या तणावाचे एक कारण होते, असेही या अहवलात म्हण्यात आले आहे. 

Rohit Vemula was not a Dalit, his mother had prepared a fake caste certificate! Clean chit to all accused by Telangana Police | रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

रोहित वेमुला (Rohith Vemula) आत्महत्येप्रकरणी तेलंगणापोलिसांनी शुक्रवारी एक क्लोजर रिपोर्ट दाखल केली. या रिपोर्टमध्ये अथवा अहवालात तत्कालीन सिकंदराबादचे खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन रामचंद्र राव, कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीवीपी) नेते, तसेच महिला आणि बाल विकास मंत्री स्मृति ईरानी यांच्यासह सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे. 

रोहितने आत्महत्या केली आरण तो अनेक कारणांमुळे तनावाखाली होता. कॅम्पसमधील राजनातील व्यस्तता आणि त्यामुळे शैक्षणिक पातळीवर खराब कामगिरी हेदेखील एक कारण होते. याशिवाय, त्याच्या आईने त्याच्यासाठी बनावट अनुसूचित जाती (एससी) प्रमाणपत्राची व्यवस्था करणे, हेदेखील त्याच्या तणावाचे एक कारण होते, असेही या अहवलात म्हण्यात आले आहे. 

अहवालात म्हणण्यात आले आहे, “मृत व्यक्तीच्या शिक्षणाचा विचार करता, असे दिसून येते की, तो अभ्यासापेक्षाही कॅम्पसमधील विद्यार्थ्यी राजकारणात अधिक व्यस्त होता. त्याने त्याची पहिली पीएचडी 2 वर्ष केल्यानंतर बंद केली आणि दुसरी पीएचडी करायला सुरुवात केली. यातही अशैक्षणिक कामांमुळे फारशी प्रगती दिसून आली नाही.'' एवढेच नाही, तर "आपल्या आईने आपल्यासाठी एससी प्रमाणपत्राची व्यवस्था केली आहे, याची कल्पनाही रोहितला होती. तसेच, आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती मिळाली, तर आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, अशी चिंताही त्याला वाटत होती, असेही या अहवालात म्हण्यात आले आहे.

या अहवालानुसार, "आपण अनुसूचित जातीचे नाही आणि आपल्या आईने आपल्यासाठी एससी प्रमाणपत्र मिळवले आहे, हे मृत व्यक्तीला महीत होते. हे देखील भीतीचे एक कारण असू शकते. कारण हे उघड झाले असते तर, त्याला अनेक वर्षे मिळवलेल्या शैक्षणिक पदव्या गमवाव्या लागल्या असत्या आणि खटल्याला सामोरे जावे लागले असते. अशा प्रकार, मृताला अनेक मुद्दे त्रासदायक झाले होते. जे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकत होते. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, आरोपींच्या कृत्यांमुळे मृताला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, हे सिद्द करणारा कुठलाही पुरावा मिळाला नाही.

तेलंगणामध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि मतदानाच्य केवळ 10 दिवस आधीच हा अहवाल आला आहे. 17 जानेवारी, 2016 रोजी हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये 26 वर्षीय रोहित वेमुलाने आपल्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि अेक ठिकाणी निदर्शनेही झाली होते.
 

Web Title: Rohit Vemula was not a Dalit, his mother had prepared a fake caste certificate! Clean chit to all accused by Telangana Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.