अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:02 PM2024-05-12T12:02:39+5:302024-05-12T12:03:35+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

Loksabha Election - PM Narendra Modi mega plan in Varanasi before filing nomination papers | अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन

अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन

वाराणसी - Narendra modi in Varanasi ( Marathi News )  उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एनडीएचे नेतेही हजर राहतील. तत्पूर्वी सकाळी ते अस्सी घाटावर जातील. तिथून १० वाजता कालभैरव मंदिरात दर्शन करतील. त्यानंतर जवळपास १०.४५ च्या पुढे ते एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतील. आणि ११.४० वाजता मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी ४ अनुमोदक असतील. त्यात आचार्य गणेशवर शास्त्री, सोमा घोष सरोज चूडामणी, माझी समाजाचे एक प्रस्तावक आणि एक महिला प्रस्तावक असण्याची शक्यता आहे.

१३ आणि १४ मे रोजी पंतप्रधान मोदींचा असा असेल कार्यक्रम

पंतप्रधान मोदी सकाळी १० वाजता पटना येथील गुरुद्वारा येथे जातील. तिथे निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील

सकाळी १०.३० वाजता हाजीपूर इथं रॅली, १२ वाजता मुझफ्फरपूर, २.३० वाजता सारण आणि संध्याकाळी ५ वाजता वाराणसी रोड शो

मंगळवारी सकाळी अस्सी घाटावर जाणार

१०.१५ वाजता कालभैरव मंदिरात मोदी दर्शनाला जातील

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदींच्या उपस्थितीत एनडीए नेत्यांची बैठक होईल

सकाळी ११.४० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दुपारी १२.१५ वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक

त्यानंतर पंतप्रधान मोदी झारखंडसाठी रवाना होतील. 

दुपारी ३.३० वाजता कोडरमा गिरिडिह येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करतील. 

वाराणसी येथील खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील २ लोकसभा निवडणुकीत कधीही लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन मतदान मागितले नाही. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी परंपरेनुसार मोदी काशीच्या रस्त्यावरून रोड शो काढतील. 

दरम्यान, वाराणसी लोकसभा जागेवर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी ७ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी २ दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी १३ आणि १४ मे रोजी पंतप्रधान रोड शो आणि उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
 

Web Title: Loksabha Election - PM Narendra Modi mega plan in Varanasi before filing nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.